E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भाजप मंत्र्याचा दिल्लीत अतिरेक
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
तरुणाला कानशिलात लगावली
नवी दिल्ली : दिल्लीतील भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी रस्ते पाहणीवेळी जाब विचारणार्या तरुणाला थप्पड मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने या घटनेवरुन मंत्र्यांवर टीका केली.
साहेब सिंग याने सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते आणि रस्त्याचा पृष्ठभाग कसा खराब होत आहे हे मी त्यांना दाखवले. तेव्हा मंत्री वर्मा यांना ही बाब सहन झाली नाही. त्यांनी मला थोबाडीत मारली. तो पुढे म्हणाला, मी आमदारांसाठी सर्व समाज माध्यमा संबंधित काम पाहतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते, म्हणून आम्ही आलो होतो. घटनास्थळी पोलिस उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वर्मा माफी मागावी आणि आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करावी. आम्ही पोकळ दावे करत नसून; प्रत्येक गोष्टीची चित्रफीत हा पुरावा आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, प्रवेश वर्मा म्हणाले, आम आदमी पार्टीकडून प्रसारित होत असलेल्या चित्रफितीमागचे सत्य जाणून घ्या. विकासपुरी रिंग रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. स्थानिक आमदार जरनैल सिंग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कंत्राटदाराशी संपर्क साधून दलाली मिळवून देण्याची विनंती करत होते. आमच्या अभियंत्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दलाल मिळाली नसल्याने रात्री रस्ता तयार होताच सकाळी ते जाऊन तो उखडून टाकत असे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या चित्रफिती बनवत असे.ते म्हणाले की, जेव्हा जरनैल सिंग यांच्या एका कार्यकर्त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तेव्हा रागाच्या भरात कोणताही माणूस जे करेल तेच मी केले.
आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, रस्ते बांधणीतील भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिल्यामळे खवळलेल्या मंत्र्यांनी तरुणाला जाहीरपणे कानशिलात मारली. मी उद्या या रस्त्याची पाहणी करण्यासाठी टिळक नगरला भेट देणार आहे. या घटनेसंदर्भात काँग्रेसने ’एक्स’वर लिहिले की, एका तरुणाने दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा यांना रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल प्रश्न विचारला. यामुळे मंत्री संतापले आणि त्यांनी रागाच्या भरात त्या तरुणाला कानशिलात मारली. भाजपने हे लक्षात ठेवावे की नागरिक काहीही विसरत नाहीत.
Related
Articles
उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी; कोरियन द्वीपकल्पात तणाव
04 Oct 2026
वाचक लिहितात
07 Oct 2026
खंडाळ्यात 74 लाखांचे कोकेन जप्त
08 Oct 2026
क्रिकेटच्या लोकप्रियतेनंतरही भारतात फुटबॉलची मोठी क्षमता : फोरलान
06 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान