पंजाब विद्यापीठात विद्यार्थ्यांची निदर्शने   

अत्याचाराचा आरोप; महामार्गही रोखला

फगवाडा : पंजाबच्या फगवाडामधील एका खासगी विद्यापीठात एका बाहेरील व्यक्तीने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी आवारात जोरदार आंदोलन केले. तसेच मालमत्तेचे नुकसान करण्याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग देखील रोखला. दरम्यान,  विद्यापीठाने कोणताही अत्याचार झाला नसल्याचे सांगत त्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.       
 
पोलिसांनी देखील आरोपबाबात सांगितले की, अत्याचाराचे  कोणतेही पुरावे नाहीत.जालंधर-फगवाडा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले  दरम्यान, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात विद्यार्थ्यांनी खिडक्यांच्या काचा, फ्लावर पॉट फोडले. तसेच काही दुकानांना आग लावली. महामार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक अन्यत्र जालंधरमार्गे वळवली. तीन दिवसांपूर्वी प्लंबरने अत्याचार केल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला. त्यानंतर विद्यार्थिनींच्या वसतिगृहात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गोेंधळ उडाला होता. 
 
वसतिगृह चालकांना माहिती दिली. मात्र, कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी दीड वाजण्याच्या सुमारास जमत असल्याचे समजताच कपुरथाला, जालंधर आणि होशियारपूर येथून पोलिस पथके घटनास्थळी रवाना झाली. 
 
पोलिस महासंचालक नवीन सिंगला घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की,मुलगी घरी परतली असून या प्रकरणीं कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार गुन्हा दाखल करुन तपास केला जाईल. 

Related Articles