ममतांमुळे २७ लाख मतदारांची नावे गायब   

अधिकारी यांचा दावा; एसआयआरचे समर्थन

कोलकाता : मतदार याद्यांच्या ’विशेष सखोल पुनरावलोकन’ प्रक्रियेचे समर्थन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केले आहे. तसेच २७ लाख मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले.  ही नावे वगळण्यासाठी भाजप किंवा निवडणूक आयोग यांना जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
अधिकारी म्हणाले, २७ लाख नावे मतदार यादीतून वगळण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांची आहे, त्यांनीच दाखल केलेल्या एका खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायिक अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांवरील ममता बॅनर्जी यांच्या टीकेनंतर दुसर्‍याच दिवशी अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली. बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, भाजपला बंगालवर ताबा मिळवून देण्यासाठी ’एसआयआर’चा वापर केला जात आहे आणि त्यांनी ’एसआयआर’पूर्वीच्या मतदार यादीच्या आधारे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून पराभव झाला होता. राज्यातील ममतांची सलग १५ वर्षांची सत्ता गेली होती. 
 

Related Articles