E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देऊ : नरेंद्र मोदी
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
नवी दिल्ली : भारत पूर्वीसारखा राहिला नाही. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल. पूर्वी बॉम्बस्फोटाच्या मालिका होणे ही एक साधारण गोष्ट होती. पण आता भारत दहशतवाद सहन करत नाही. आम्ही दहशतवादावर झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्टपणे सांगितले.
’मन की बात’ च्या १३८ व्या भागात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. १० वर्षांपूर्वी २८-२९ सप्टेंबर, २०१६ रोजी भारतीय लष्कारने नियंत्रण सीमेवर अतुल्य शौर्य गाजवले. ते पाहून जग थक्क झाले. सर्जिकल स्ट्राईकमुळे संपूर्ण जगात भारताच्या दहशतवादविरोधातील धोरणाचे उदाहरण समोर आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या एका दशकात बालाकोट एअर स्ट्राईकपासून ते ऑपेरशन सिंदूरपर्यंत भारताने वारंवाद स्पष्ट संदेश दिला आहे. जर भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. आता भारताने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्याचे परिणामही जग पाहत आहे, असेे मोदी म्हणाले.
यापूर्वी दहशतवादी हल्ला झाला की, पाकिस्तावर कारवाईची मागणी व्हायची. पण त्यावेळी त्यावर इतके लक्ष देण्यात येत नव्हते. वेळ काढूपणा करण्यात येत होता. मात्र, आताचा भारत हा दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवत असून, आपण त्याचे परिणामही पाहत आहोत, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
तुर्कियेच्या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला
08 Oct 2026
काळेवाडीत खासगी शाळेच्या बसचा अपघात
13 Oct 2026
कचर्यापासून तयार होणार्या बायोगॅस प्रकल्पांसाठी कृतिगट
14 Oct 2026
आंबेगाव तालुक्यात शनिवारी भाद्रपद बैलपोळा
08 Oct 2026
किल्ला चढताना पर्यटकाचा मृत्यू
12 Oct 2026
स्टारलिंक : नाकापेक्षा मोती जड!
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात