E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
छत्तीसगढमध्ये पुरात अडकलेल्या पाच हजार जणांची सुटका
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
जगदलपूर : छत्तीसगढमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे पाच हजार नागरिकांची सुटका करण्यात यश मिळाले. १६ जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, अशी माहिती अधिकार्यांनी रविवारी दिली. दरम्यान, धमतरी येथील एका दुकानातून वाहून जाणार्या मद्याच्या बाटल्या स्थानिक नागरिक ोळा करत असल्याचे चित्रफितीत दिसून आले.
बस्तर भागात महामार्गावर अडकलेल्या सहा मालमोटार चालकांची आणि त्यांच्या मदतनीसांनी सुटका करण्यात आली. ते वाहनांच्या छतावर अडकले होते. धमतरी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वाहून गेल्यामुळे दोन व्यक्ती बेपत्ता आहेत; तसेच बिलासपूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहणार्या अर्पा नदीत अंघोळ करताना दोन मुले वाहून गेली, त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पावसाचा जोर ओसरला असला तरी, वरच्या भागातून येणार्या पाण्यामुळे आणि धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नद्या व ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे विशेषतः बस्तर आणि लगतच्या भागांत पूरसदृश परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे, असे अधिकार्यांनी नमूद केले.
बस्तर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजाराहून अधिक नागरिकांची सुटका करून त्यांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.काल सकाळी डोंगाघाट भागात अडकलेल्या १६ जणांची हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुटका करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाने जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत ४३ मदत छावण्या उभारल्या आहेत, तेथे पाच हजाराहून अधिक नागरिकांच्या निवारा, अन्न आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत, असे अधिकार्याने सांगितले.
शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत इंद्रावती नदीची पाणी पातळी १२.५६ मीटरपर्यंत पोहोचली होती, जी धोक्याच्या पातळीपेक्षा ४.२६ मीटर अधिक आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे सखल आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे; तसेच संवेदनशील भागांवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आणि गरज पडल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश क्षेत्रीय पथकांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
Related
Articles
रस्त्यांवरून नागरिकांची अडवणूक करणार्या विकसकांना ’पीएमआरडीए’चा दणका
14 Oct 2026
विमानातूनच घेतले ताब्यात
11 Oct 2026
इराकच्या चलनाचे आणखी अवमूल्यन
08 Oct 2026
उसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
14 Oct 2026
विशाखापट्टणममध्ये नऊ कोटींचे सोने जप्त
12 Oct 2026
कॅप्टन स्मितच्या शौर्याने भारताचा जगभर गौरव !
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात