E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सरसकट दुष्काळ जाहीर करा
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी
मुंबई : राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांमध्येही परिस्थिती गंभीर असल्याने राज्यातील सर्व तालुक्यांत सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. दुष्काळाच्या प्रश्नावर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि दुष्काळी मदत दिवाळीपूर्वी वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांसाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. संपूर्ण जमीन महसूल माफ करावा, शेतीशी संबंधित कर्जे माफ करावीत, कृषी पंपांची वीजबिले माफ करावीत, तसेच दुष्काळग्रस्त भागात वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
रोजगार हमी योजनेचे निकष शिथिल करून मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात रोजगाराची कामे सुरू करावीत. पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य मोफत द्यावे, पशुधनासाठी थेट खात्यात अनुदान जमा करावे, असे पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस आणि धानाचे नुकसान झाल्याने शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी. शेतकर्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, तसेच वसतिगृह आणि खानावळ शुल्क माफ करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत असल्याने पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या चारा-पाण्याचे तातडीने नियोजन करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पक्षाचे आमदार आणि खासदार दुष्काळ निवारणासाठी एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Related
Articles
सीजेपीच्या आंदोलनात ममता सहभागी होणार?
09 Oct 2026
आधी नियोजन, आता निधी कपात; जिल्हा परिषदेत सदस्यांची कोंडी
13 Oct 2026
केबल व्यवस्थेतून पिंपरी महापालिकेला 294 कोटींचे उत्पन्न
08 Oct 2026
सह्याद्रीच्या व्याघ्रप्रकल्प आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा
08 Oct 2026
ख़ुशी का पयाम कहीं दर्दनाक लाया
09 Oct 2026
रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह रुग्ण थेट रस्त्यावर पडल्याच्या घटनेची गंभीर दखल
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात