‘समृद्धी’द्रुतगती मार्गावर चालकाला डुलकी; तिघांचा मृत्यू   

मोटारीची मालमोटारीला मागून धडक 

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी द्रुतगती मार्गावर शनिवारी रात्री मोटारीने मालमोटारीला मागून धडक दिली. त्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कुटुंबप्रमुख प्रतिक रामकिसन जगदाळे मोटार चालवत होते. अचानक त्यांना डुलका लागल्यामुळे अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. 
 
प्रतीक रामकिसन जगदाळे, त्यांची पत्नी श्रेया जगदाळे आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. समृद्धी द्रुतगती मार्गावरील वेरूळ ते छत्रपतीं संभाजीनगर पट्ट्यात नाशिक ते जालना प्रवास करणारी मोटारीने अचानक कंटेनरला मागून धडक दिली होती. धडक एवढी भीषण होती की, मोटार कंटेनरच्या खाली घुसली होती.  
 
मोटारीचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाल्याचे आणि खिडक्यांच्या काचा फुटल्याचे  छायाचित्रातून दिसले. दरम्यान, प्राथमिक तपासानुसार प्रतीक जगदाळे मोटार चालवत होते. अचानक त्यांना डुलका लागला आणि मोटार पुढे धावत असलेल्या मालमोटारीला धडकली. 
 

Related Articles