E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जुन्नरच्या पूर्व भागात दुष्काळ जाहीर करा
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, बांगरवाडी, रानमळा, बेल्हे, गुळंचवाडी परिसरातील शेतकरी संकटात
पिके जळाली, पिण्याच्या पाण्याचीही टंचाई
आळेफाटा, (वार्ताहर) : राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले असले,तरी या यादीत जुन्नर तालुक्याचा समावेश झालेला नाही. मात्र, जुन्नर तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला, तरी पूर्व भागातील पठारी परिसरात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका एकाच निकषाने दुष्काळी यादीतून वगळणे अन्यायकारक असल्याची भावना पूर्व भागातील शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, बांगरवाडी, रानमळा, बेल्हे, गुळंचवाडी, राजूरी यांसह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिके करपून गेली असून, शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकीकडे तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र दिसत असले, तरी पूर्व भागातील पठारी परिसरात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
शेतात पिके जळत आहेत आणि दुसरीकडे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती यांचा गावनिहाय व विभागनिहाय आढावा घेऊन जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र दुष्काळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ संपूर्ण तालुक्याच्या सरासरी पावसाच्या आकडेवारीवर निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
पश्चिमेचा पाऊस, पूर्वेची तहान!
जुन्नर तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता पावसाचे वितरण सर्वत्र समान नसते. त्यामुळे तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता पूर्व भागातील गावांची स्वतंत्र वस्तुनिष्ठ पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. सरकारने तातडीने दखल न घेतल्यास खरीप हंगामासोबतच आगामी रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Related
Articles
राज्यात १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात !
06 Oct 2026
कॉस्मेटिकच्या डब्यातून ‘हशिश’चा चोरटा व्यापार
05 Oct 2026
विमानाला घातपात करण्याचे कारस्थान पूर्वीच रचले : हमाम
06 Oct 2026
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी प्रक्रिया पूर्ण
08 Oct 2026
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
09 Oct 2026
शरद पवार दुष्काळ पाहणीवर पुरंदर तालुक्यात शेतकर्यांशी संवाद
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान