E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कुतूहल ज्ञान प्राप्तीचा पहिला टप्पा : भाऊ तोरसेकर
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
सोलापूर, (प्रतिनिधी) : समाजात घडणार्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहता आले पाहीजे. त्यासाठी आपल्याकडे कुतूहल असले पाहिजे. कुतूहल हा ज्ञान प्राप्तीचा पहिला टप्पा आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.
ब्राह्मण समाज सेवा संघातर्फे रविवारी शिवस्मारक सभागृहात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तर जेष्ठ अभियंता हरी मुस्तीकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक हरी गोडबोले होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी ट्रस्टच्या अध्यक्षा मीना चाटी, ब्राह्मण समाज सेवा संघाचे अध्यक्ष दत्तराज कुलकर्णी, ट्रस्ट आणि सेवा संघाचे सचिव राम तडवळकर उपस्थित होते.
भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले, सध्या समाजाला वस्तुनिष्ठ पत्रकारितेची गरज आहे. पूर्वीच्या काळात पत्रकारितेला गांभीर्य होते. हे गांभीर्य हरवत चालले आहे. समाज मनाचा कानोसा घेण्यासाठी विचारशक्ती वाढवली पाहिजे. पालकांसारखा उत्तम शिक्षक नाही. शिक्षक आणि पालक यांनी मुलांचे कुतूहल जागे ठेवणे आवश्यक आहे. शिकायचे कसे हे मुलांना शिकवण्याची गरज आहे, असेही तोरसेकर यांनी सांगितले.
डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी ट्रस्ट आणि ब्राह्मण सेवा संघाचे सचिव राम तडवळकर यांनी प्रास्ताविक केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर संचालक वामन कुलकर्णी यांनी आभार मानले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक महेंद्र देवस्थळी, सुधीर तडवळकर, जितेश कुलकर्णी, संजय कुलकर्णी, सुधीर तडवळकर, सुधीर कुलकर्णी, रणजित विश्वरूपे, डॉ. गिरीश कुमठेकर, दैदिप्य वडापूरकर आदींसह समाज बांधव नागरिक उपस्थित होते.
Related
Articles
अभिषेकला रोखणे कठीण : स्प्रिंगर
13 Oct 2026
इंडिगोच्या विमानात पॉवर बँकमध्ये आग
12 Oct 2026
सौरव दास, आशुतोष रांका पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
14 Oct 2026
जिबूतीजवळ बोट उलटून १०९ जणांचा मृत्यू
12 Oct 2026
तुषार देशपांडेचे हॅटट्रिकसह पाच बळी
13 Oct 2026
आठवडाभरात मिरच्यांच्या दरात 20 रुपये वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात