कर्मचार्‍यांच्या संपामुळे बँका तीन दिवस बंद   

नवी दिल्ली : पाच दिवसांचा आठवडा करावा आणि अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या काळात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली आहे.
 
संपाचा परिणाम प्रामुख्याने शाखांच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम यांसारख्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची अपेक्षा आहे. बँक युनियनचा संप आजपासून तीन दिवस सुरू राहणार आहे. या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेच्या शाखेतील व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात.

Related Articles