जामखेड (वार्ताहर) : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. अनिकेत निमगावकर (२९, वडगाव शेरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. २५ सप्टेंबरला दुपारी २ ते २६ सप्टेंबर सकाळी साडेदहा दरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.सुरेश निमगावकर यांनी जामखेड पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी कदम अधिक तपास करत असून, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Fans
Followers