E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पाकिस्तानात उत्पादन झालेल्या क्रीमची पिंपरीत विक्री
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
जप्तीची कारवाई
पिंपरी : भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मेड इन पाकिस्तान नमूद केलेल्या गोरी ब्यूटी क्रीमची पिंपरीतील दुकानातून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने रिव्हररोड परिसरात कारवाई करून १२ हजार ६५० रुपये किंमतीच्या २३ क्रीम जप्त केल्या.
प्रकाश मनोहरलाल गुरू (३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरी ब्यूटी क्रीमच्या भारतातील कंपनीचे अधिकृत तपासणी अधिकारी रईसोदीन इनामदार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
रिव्हर रोडवरील पीएमपीएमएल बस थांब्याजवळ असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स दुकानात ’मेड इन पाकिस्तान’ नमूद असलेल्या आणि भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या बनावट गोरी ब्यूटी क्रीमची विक्री होत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली होती. त्यानुसार, एटीबीच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या मदतीने दुकानात कारवाई केली. तपासणीदरम्यान दुकानात प्रत्येकी ५५० रुपये किंमतीच्या २३ क्रीम आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत १२ हजार ६५० रुपये आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तानातील वस्तूंवर भारतात बंदी
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या २ मे २०२५च्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून भारतात सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ’मेड इन पाकिस्तान’ नमूद असलेल्या वस्तूंची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Related
Articles
गांजाचा चोरटा व्यापार
06 Oct 2026
सिंहिणींसह छाव्यांना जीवदान
08 Oct 2026
पोलिस अधिकार्याकडून आंदोलनावेळी लैंगिक छळ?
05 Oct 2026
हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाले; वैमानिक मच्छार यांची भावना
03 Oct 2026
मथुरेत धातूंची शुद्धता तपासण्यासाठी यंत्रे
03 Oct 2026
भाजपचे राज्यसभेसाठी आठ उमेदवार जाहीर
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान