E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रूग्णालयावरील कारवाई टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकार्याकडून २० लाखांची मागणी
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
३० हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात
पुणे : विश्रांतवाडी-धानोरी परिसरातील खासगी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागून त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना पुणे महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (एसीबी) रंगेहाथ पकडले.
डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे सोसायटी, विमाननगर) असे वैद्यकीय अधिकार्याचे नाव आहे. महिला डॉक्टरने एसीबीकडे तक्रार दिली होती. तिचे धानोरी परिसरात खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयातील कथित अनियमिततेबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची चौकशी करण्याची जबाबदारी डॉ. चकोर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार, १८ सप्टेंबर रोजी ते रुग्णालयात चौकशीसाठी गेले. त्यानंतर अहवाल वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांकडे सादर करावा लागेल. रुग्णालयात त्रुटी आढळल्यास नोंदणी रद्द होऊ शकते, अशी भीती दाखवत कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर डॉ. चकोर यांनी तक्रारदार महिला डॉक्टरकडून १५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर आणखी ३० हजार रुपये घेण्यासाठी त्यांनी तिला नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बोलाविले. दरम्यान, महिलेने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकार्यांनी पडताळणी केली आणि शनिवारी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील डॉ. चकोर यांच्या दालनाच्या परिसरात सापळा लावला.
यावेळी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने डॉ. चकोर यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ, सतीश वाळके, हवालदार प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, वनिता गोरे आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related
Articles
दिल्लीत ५० कोटींचे अमली पदार्थ जप्त
06 Oct 2026
मंगळवेढ्यातील २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा
08 Oct 2026
जिल्ह्यात पावसाची मोठी तूट
07 Oct 2026
सीजेपीच्या आंदोलनात ममता सहभागी होणार?
09 Oct 2026
पर्वकाळात काठमांडू खोर्यात 3 हजार 500 पोलिस तैनात
04 Oct 2026
मुकेश-आकाशची भेदक गोलंदाजी शेष भारताला विजेतेपद
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान