E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताचा दणदणीत विजय
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
समरकंद : ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दहाव्या फेरीत भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तान-२ संघाचा ३.५-०.५ असा पराभव करत १७ गुणांसह दुसरे स्थान मजबूत केले. दुसरीकडे, भारतीय महिला संघाने आघाडीवर असलेल्या चीनविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधत १६ गुणांसह तिसरे स्थान कायम ठेवले. त्यामुळे दोन्ही संघांच्या पदकाच्या आशा कायम आहेत.
उझबेकिस्तान-२ विरुद्ध निहाल सरीनने मुखम्मदजोहिद सुयारोवचा पराभव करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर विश्वविजेता डी. गुकेशने ओर्टिक निग्मातोवला नमवून आघाडी वाढवली. अर्जुन एरिगैसीने अब्दिमालिक अब्दिसालिमोवविरुद्ध डाव बरोबरीत सोडवला, तर आर. प्रज्ञानंदने जाखोंगीर वाखिदोवचा पराभव करून भारताचा ३.५-०.५ असा विजय निश्चित केला.
भारताचे १७ गुण असून उझबेकिस्तान-१ संघ १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. उझबेकिस्तानने आर्मेनियाचा ३.५-०.५ असा पराभव केला. अंतिम फेरीत भारताला विजय मिळवण्यासोबतच उझबेकिस्तान-१ च्या पराभवाची आवश्यकता असेल.
महिलांची चीनविरुद्ध २-२ अशी बरोबरी
महिला विभागात भारताने अव्वल चीनला कडवी झुंज देत २-२ अशी बरोबरी साधली. बी. साविता श्रीने झाई मोचा पराभव करत स्पर्धेतील आठवा विजय नोंदवला. नऊ डावांत तिच्या खात्यात ८.५ गुण झाले आहेत. कोनेरू हम्पी-झू जिनेर आणि दिव्या देशमुख-सोंग युक्सिन यांचे डाव बरोबरीत सुटले, तर वंतिका अग्रवालला लू मियाओयीकडून पराभव पत्करावा लागला.
Related
Articles
म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहोचवा
06 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार जागतिक नायक : नेतन्याहू
05 Oct 2026
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात आठवड्यातून दोन दिवसआड पाणी
07 Oct 2026
पोटेगाव बंधार्याच्या दुरुस्तीवरून शेतकरी संतप्त
05 Oct 2026
’आप’च्या प्रियांका कक्कर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
04 Oct 2026
कॉस्मेटिकच्या डब्यातून ‘हशिश’चा चोरटा व्यापार
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान