E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तिरंदाजीत भारताचा दबदबा
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
चारही संघ उपांत्य फेरीत
आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजीत भारताने दमदार कामगिरी करत पुरुष व महिला कंपाउंड संघांसह मिश्र कंपाउंड आणि रिकर्व संघांचीही उपांत्य फेरी गाठली. सर्फिंगमध्येही तीन भारतीय खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.
कंपाउंड मिश्र संघात चिकिथा तानिपार्थी आणि साहिल जाधव यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाचा १६०-१४६ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानवर १५९-१५४ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. रिकर्व मिश्र संघातील धीरज बोम्मादेवरा आणि कुमकुम अनिल मोहोद यांनीही प्रभावी कामगिरी केली. भारतीय जोडीने यूएईचा ६-० असा पराभव केल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामलाही ६-० ने हरवले.
पुरुष, महिला कंपाउंड संघही अंतिम चारमध्ये
ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तानिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांच्या महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानचा २३३-२३० असा पराभव केला. पुरुष संघानेही भूतानवर २३५-२३२ अशी मात केली. त्याआधी महिला संघाने मंगोलियाला २३८-२२३, तर पुरुष संघाने यूएईला २३५-२१५ असे हरवले होते. दोन्ही भारतीय संघांचा उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाशी सामना होणार असून पदकाच्या लढती ३० सप्टेंबरला होतील. कंपाउंड मिश्र संघाची स्पर्धा महत्त्वाची असून, एलए२८ ऑलिम्पिकमध्ये या प्रकाराचा प्रथमच समावेश होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतून या प्रकारासाठी एक ऑलिम्पिक कोटा उपलब्ध आहे. सर्फिंगमध्ये शुगर शांती गायेन आणि कमली प्रकाश यांनी महिलांच्या शॉर्टबोर्ड प्रकारातील आपापल्या हीट जिंकून तिसर्या फेरीत प्रवेश केला. शुगर शांतीने ७.३३ गुणांची नोंद करत चायनीज तैपेईच्या चेन वान-यूचा (५.४०) पराभव केला.
Related
Articles
सुग्रीवामुळे कुंभकर्णाला मिळाले जीवदान
05 Oct 2026
लेखी आदेश आल्याशिवाय पाणी कपातीचा निर्णय नाही
06 Oct 2026
वाचक लिहितात
03 Oct 2026
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
03 Oct 2026
वनश्री वनकर यांना केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक
08 Oct 2026
चांदिवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान