E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सोजनला लांब उडीत रौप्य
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा : हरिता भद्राला २०० मीटरमध्ये कांस्य
नागोया : भारताच्या एन्सी सोजनने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला लांब उडीमध्ये ६.५३ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक पटकावले. बहुतांश वेळ आघाडीवर असलेल्या एन्सीला अखेर चीनच्या हुआंग यिंगयिंगने शेवटच्या प्रयत्नात ६.५५ मीटरची उडी मारून मागे टाकले आणि सुवर्णपदक जिंकले.
महिला लांब उडीच्या अंतिम फेरीत भारताच्या शैली सिंहला मात्र पदकाने हुलकावणी दिली. तिची सर्वोत्तम उडी ६.४२ मीटर राहिली. चीनच्या मेंगयी तानने ६.४६ मीटरची उडी मारत शैलीला मागे टाकले आणि कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, हरिता भद्राने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत २३.२० सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. जपानच्या इडो अबिगेइरुफुकाने २३.२१ सेकंदांसह चौथे स्थान मिळवले.महिला २०० मीटरमध्ये सिंगापूरच्या शांती परेराने हंगामातील सर्वोत्तम २२.७८ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. चीनच्या चेन युजीने २२.९३ सेकंदांसह रौप्यपदक मिळवले. अंतिम फेरीतील भारताची दुसरी धावपटू उन्नती अय्यप्पा बोलंड २३.४८ सेकंदांच्या वेळेसह सहाव्या स्थानावर राहिली.
२०१८ नंतर भारताला पदक
महिलांच्या २०० मीटरमध्ये भारताचा पदकाचा दुष्काळ हरिताच्या कांस्यपदकामुळे संपला. या प्रकारात भारताने यापूर्वी २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुती चंदच्या कांस्यपदकाच्या रूपाने पदक जिंकले होते. २३ वर्षीय हरिता आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० मीटरचे पदक जिंकणारी भारताची सहावी महिला ठरली. महाराष्ट्राच्या हरिताने आशियाई स्पर्धेपूर्वी ६५व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २३.१४ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. आशियाई स्पर्धेतील तिची वेळ या कामगिरीपेक्षा केवळ ०.०६ सेकंदांनी अधिक होती.
Related
Articles
पुढील महिन्यात पंतप्रधान बारामतीत
04 Oct 2026
माझे एक्स हँडलवर बंदीचे आश्चर्य नाही
03 Oct 2026
भाजपचे राज्यसभेसाठी आठ उमेदवार जाहीर
06 Oct 2026
पर्वकाळात काठमांडू खोर्यात 3 हजार 500 पोलिस तैनात
04 Oct 2026
शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद
05 Oct 2026
‘एमपीएससी’ आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान