E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
ज्ञानेशकुमारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच काही निर्णयांमुळे वादाच्या भोवर्यात राहिली आहे. त्यांच्या कार्यकाळातील काही निर्णय लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत. त्यातच आता त्यांचे दोन सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी विविध निर्णयांवर वारंवार लेखी आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा महिन्यांत तब्बल १४ वेळा आक्षेप नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. काही निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचेही या आक्षेपांतून समोर आले आहे. निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र घटनात्मक संस्थेच्या कार्यपद्धतीबाबतच असे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याचे गांभीर्य निश्चितच आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावर टीकेचा सूर लावला असताना भाजपचे नेते मात्र निवडणूक आयोगाची पाठराखण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या वादात भाजपचे नाव थेट नसतानाही आयोगाच्या बचावासाठी पुढे येण्याची पक्षाला एवढी गरज का भासावी? आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था असताना तिच्या निर्णयांचे समर्थन करण्याची जबाबदारी भाजपने का घ्यावी? आयोगाने सर्व निर्णय सर्वसंमतीने घेतल्याचे स्पष्ट केले असले, तरी दोन आयुक्तांनी वारंवार नोंदवलेल्या आक्षेपांचे स्पष्टीकरण जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
दीपक काशिराम गुंडये, वरळी.
करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी!
मुंबई महानगरपालिका, पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, विमान वाहतूक प्राधिकरण अशा विविध शासकीय संस्थांमधील समन्वयाच्या अभावी होणार्या चुकांमुळे करदात्यांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. ’आधी बांधकाम करायचे, मग चूक लक्षात आल्यावर ते तोडून पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्त करायचे’ हा नवीनच प्रकार मुंबईत सुरू झाला आहे. आधी मुंबईच्या अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमेला जोडणार्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे झालेली चूक सुधारण्यासाठी पालिकेला पर्यायाने करदात्यांना १० कोटी रुपयांचा नाहक अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. या पुलाचा एकूण खर्च १०० कोटी रुपयांच्या वर गेला. हा धक्का ताजा असतानाच अंधेरी पूर्व (गुंदवली) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ ला थेट जोडणार्या मेट्रो ७ अ चा जवळपास पूर्ण झालेला सुमारे १ किलोमीटरचा उन्नत मार्ग (व्हायडक्ट) पाडावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयासाठी एक ’सामायिक समन्वय समिती’ स्थापन करणे गरजेचे आहे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
आग नसताना धूर...
’मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवा’ ही मागणी म्हणजे जुना राग नव्याने आळवण्यासारखे आहे. एमआरआय आणि मतचोरीचा आलापही जुनाच आहे. जेव्हा एखाद्या आयोगात अनेक सदस्य असतात तेव्हा प्रत्येक सदस्य आपले मत मांडू शकतो आणि निर्णयावर डिसेन्टही देऊ शकतो; पण जर निर्णयाला बहुमत असेल तो नक्कीच पारित होऊ शकतो कारण प्रत्येक वेळी निर्णय एकमताने होईल असे होत नाही. त्यामुळे इतक्या दिवसांनी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग व विवेक जोशी यांनी जो गौप्यस्फोट केला तो अतिशय संशयास्पद असून कपिल सिब्बल यांची सर्व निवडणुका रद्द करा ही मागणी बिनबुडाची आहे. प्रत्येक गोष्टीत भाजप व रा. स्व. संघाशी जोडण्याची सवय झाली आहे आणि सध्या अशा कामांची सवय नसल्याने विरोधकांना आग नसताना
धूर दिसतो हेच खरं!
माया भाटकर, पुणे
आता किंमत मोजावी लागेल
दुष्काळसदृश स्थितीने तिजोरीवर बोजा व विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे वाचून नवल वाटले. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, फडणवीसांना चिंता आहे ती, तिजोरीवर अर्थिक बोजा पडण्याची तसेच विकासकामांवर होणार्या परिणामांची. या संदर्भात फडणवीसांनी आत्मचिंतन करावे, की विधानसभा निवडणुकांच्या आधी स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रियांना रु १५०० ची मोफत खिरापत का वाटली? तसेच विकासाच्या नावाखाली राज्यभर मेट्रो सुरू करणे, पूल, रस्ते तसेच मिसिंग लिंकसारखे प्रकल्प पुरे करून अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या सर्वांमुळे तिजोरीचे आर्थिक नियोजन बिघडणे स्वाभाविकच आहे. तेव्हा फडणवीसांनी आता यापुढे कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेताना, तिजोरीवर येणार्या आर्थिक भाराचा विचार करूनच मग योग्य तो निर्णय घ्यावा. असो. या घडीला फडणवीसांनी राज्याच्या आर्थिक तिजोरीचा तसेच विकासकामांवर होणार्या दुष्परिणामांचा विचार करणे सोडून द्यावे व प्राप्त परिस्थितीनुसार शेतकर्यांना कोणत्याही अडचणी न येता, त्वरित आर्थिक मदत कशी मिळेल, यासाठी मनापासून प्रयत्न करावेत.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
यंदाही उंच गणेशमूर्ती समुद्र किनार्यावरच!
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी गिरगाव चौपाटीच्या किनार्यावर कितीतरी उंच गणेशमूर्ती विसर्जनाविना उभ्या होत्या, तर कितीतरी मूर्ती किनार्यावर कोसळून छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेल्या होत्या. ज्या श्री गणेशाला दहा दिवस मनोभावे पुजले जाते, त्याच्या चरणी नवस केले जातात, त्याच्या आगमनासाठी सुंदर सजावट केली जाते, वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली जाते अशा गणेश मूर्तींची झालेली अवहेलना पाहून मनाला वेदना होतात. उंच मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी मुंबईत येत असतात; मात्र याच उंच मूर्ती दुसर्या दिवशी समुद्राच्या किनारी पाहिल्यावर गणेश मूर्ती ही शोभेची आणि प्रदर्शनाची वस्तू बनू लागली आहे का? असा प्रश्न पडतो. काही मंडळे आपल्या उंच मूर्ती तराफ्यावरून खोल समुद्रात नेऊन त्यांचे विसर्जन करतात. लालबागच्या राजाचे विसर्जन तर सर्वांचेच डोळे दिपवणारे असते. यंदा मुंबईच्या राजाचे विसर्जन तर अत्यंत राजेशाही पद्धतीत डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. उंच मूर्ती आणणारे या मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जन का करत नाहीत. मंडळाकडे तेव्हढे कार्यकर्ते नाहीत किंवा भांडवल नाही तर ही मंडळे उंच मूर्ती तरी का आणतात? अनंत चतुर्दशीला अनेक मंडळे बाप्पाच्या चरणाला पाणी लागले की, तेथून पळ काढतात. भरती सरल्यावर या उंच मूर्ती किनार्यावर उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. अशा मूर्तींना मग क्रेनच्या आधारे खाली पाडून त्यांना भग्न करावे लागते. ज्या गणेशाच्या नावाने १० दिवस उत्सव साजरा केला जातो त्याचा केव्हढा हा अवमान. गणेशोत्सव हा मौजेचा नव्हे, तर श्रद्धेचा उत्सव आहे. मात्र हल्ली आपल्या मंडळाची मूर्ती किती उंच आहे हे दाखवण्याची स्पर्धा आहे.
मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई
Related
Articles
जादूगुडातील किरणोत्सर्गाच्या आरोपांचे प्रमुखाकडून खंडन
07 Oct 2026
न्यूट्रिनो कणांच्या संशोधनासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर
06 Oct 2026
कार्ल डिसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना जाहीर
06 Oct 2026
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
03 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान