व्हॉट्सऍप कट्टा   

अवयवांची गंमत...
०१. जिभेचं वजन खूप हलकं असतं; पण तिचा तोल सांभाळणं खूप कठीण असतं. 
०२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो आणि मागे पडणार्‍या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. 
०३. पाठ मजबूत ठेवा, कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
०४. माणसाने घमेंडीत एवढं उडू नये. एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरु नये. 
०५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात; पण एकमेकांना न पाहता. 
०६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं. कारण हाताला लागलं की, डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात. 
०७. एकदा हातानं पायांना विचारले, तुझ्यावर सगळे डोकं ठेवतात तो अधिकार मला का नाही, त्यावर पाय हसून म्हणाले, यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.
०८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात, तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!
०९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य; पण ते एकत्र कधीच नसतात; पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो. 
१०. एकदा देवाच्या पायावरची फुलं गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. 
११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.
१२. या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसर्‍याचं जीवन तिथेच संपतं.
-----
एका आवडलेल्या इंग्रजी व्हॉटसअप मेसेजचे स्वैर भाषांतर- 
एकदा फिजीक्सच्या टीचरने मुलांना प्रश्न विचारला, ‘कारमधे ब्रेक्स का लावलेले असतात?‘
त्यावर निरनिराळी उत्तरे आली
 
‘थांबण्यासाठी‘
‘वेग कमी करण्यासाठी‘
‘अपघात टाळण्यासाठी‘
परंतू सर्वात चांगले उत्तर होते
‘जास्त वेगाने जाता येण्यासाठी‘ असे कसे? जरा विचार करा. जर तुमच्या कारमधे ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल?
कारला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छीत स्थळी पोहोचू शकता.
 
जीवनातही तुम्हाला पालक, शिक्षक, मित्र, इ. रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात, अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला चिड आणतात. परंतु लक्षात ठेवा जिवनात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता. म्हणूनच जिवनात अधूनमधून येणार्‍या अशा ‘ब्रेक्सची‘ जाण ठेवा. त्यांचा योग्य वापर करा.
------
सफलता नेहमी चांगल्या विचारातून येते
चांगले विचार हे नेहमी चांगल्या 
विचार असणार्‍या माणसांच्या संगतीतून येतात
आणि म्हणूनच मला अभिमान व आनंद आहे की मी चांगले विचार असणार्‍या लोकांच्या संगतीत आहे.

Related Articles