E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शांतता क्षेत्राचे मार्किंगच नाही; न्यायालयाच्या आदेशांकडेही दुर्लक्ष
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर टीका
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाय योजनांवर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शांतता क्षेत्रांचे योग्य प्रकारे मार्किंग न करणे, लोखंडी सिलिंडर वाजविण्यासारख्या प्रकारांवर प्रभावी कारवाई न करणे, तसेच ४ बेस ४ टॉपसारख्या अशास्त्रीय पद्धतींच्या वापरामुळे ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे प्रयत्न अपुरे ठरल्याची टीका मंचाचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी केली.
ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे किर्दत यांनी म्हटले आहे. विशेषत: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका निष्क्रिय आणि बेफिकीर राहिल्याने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. प्रशासनाने ध्वनिप्रदूषणाविरोधात केलेल्या कारवाईची दररोजची माहिती सार्वजनिक करणे आवश्यक असतानाही ती जाहीर करण्यात आली नाही. कोणत्या भागात किती कारवाई झाली, किती उपकरणे अथवा ध्वनिवर्धकांवर कारवाई करण्यात आली आणि न्यायालयीन निदेर्शांचे कितपत पालन झाले, याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शांतता क्षेत्राची स्पष्ट हद्द निश्चित करून त्याचे मार्किंग, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर तातडीची कारवाई आणि न्यायालयीन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी झाली असती तर ध्वनिप्रदूषणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता आले असते. मात्र, या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाच्या काळातील प्रशासनाच्या अपयशाची ही प्रमुख कारणे ठरली आहेत, असा दावा किर्दत यांनी केला.
१५८ तक्रारींत ६० ठिकाणी १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाज
कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकरांनी सुरू केलेल्या नागरी आंदोलनाला गणेशोत्सवाच्या काळात पहिल्या टप्प्यात यश मिळाल्याचा दावा लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने केला आहे. मंचाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरआधारित तक्रार निवारण अर्जाद्वारे पुणे शहर विभागात १५८ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी ६० तक्रारींमध्ये १०० डेसिबल किंवा त्याहून अधिक आवाजाची नोंद झाल्याचे मंचाने म्हटले आहे.
थेट आयुक्तांना रिअल टाइम तक्रारी
१४ सप्टेंबर नंतर ११२ क्रमांकावर तक्रार करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या नागरिकांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मंचाने स्वतंत्र सॉफ्टवेअरआधारित तक्रार अर्ज तयार केला. या माध्यमातून तक्रारींची माहिती रिअल टाइम पद्धतीने थेट पोलिस आयुक्तांपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्यात आले होते. तसेच तक्रारदाराची ओळख उघड होण्याची भीती लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आल्याचेही मंचाने स्पष्ट केले.
डीजेच्या आवाजाविरोधात पुणेकरांनी घेतली संघटितपणे भूमिका
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत नागरिक विद्यानंद बापट यांना बाहेर काढण्यात आल्याची घटना तसेच सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर सामान्य पुणेकरांमध्ये आवाजाविरोधात संघटितपणे भूमिका घेण्याची भावना निर्माण झाली. त्यातून लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाची स्थापना करण्यात आली. मंचाच्या पुढाकाराने डेक्कन जिमखाना येथील कलाकारकट्टा येथे आंदोलन, स्वारगेट येथे मोर्चा तसेच बालगंधर्व रंगमंदिर ते झाशीची राणी पुतळा चौक आणि तेथून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनांमध्ये कोणताही राजकीय झेंडा न घेता नागरिक सहभागी झाल्याचा दावा मंचाने केला. तसेच शहरातील ३५ हून अधिक डॉक्टरांनी आवाजाच्या आरोग्यावर होणार्या परिणामांविरोधात पुणेकरांना आवाहन करण्यात आले होते.
ठळक आकडेवारी
एकूण तक्रारी : १५८
१०० किंवा त्याहून अधिक आवाजाच्या तक्रारी : ६०
पोलिसांकडेही तक्रार केल्याचे सांगणारे : ९१
१४ सप्टेंबरच्या तक्रारी : १९
२० सप्टेंबरच्या तक्रारी : २७
२५ सप्टेंबरच्या तक्रारी : ५९
विसर्जन दिवशी २५ सप्टेंबरला सर्वाधिक तक्रारी
मंचाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहर विभागातील १५८ तक्रारींपैकी सर्वाधिक ५९ तक्रारी २५ सप्टेंबरला नोंदविण्यात आल्या. त्यानंतर २० सप्टेंबरला २७, तर १४ सप्टेंबरला १९ तक्रारी नोंदल्या गेल्या. २५ सप्टेंबरच्या तक्रारी एकूण तक्रारींच्या सुमारे ३७ टक्के आहेत.
११२ किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जास्त तक्रारी
१५८ पैकी ९१ नागरिकांनी ११२ किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांकडेही तक्रार केल्याचे नमूद केले. बाजीराव रस्ता-नातूबाग गणपती मंडळ परिसरातून १८ तक्रारी आल्या. याशिवाय कोथरूड सात, हिंगणे खुर्द पाच, धनकवडी चार, कोरेगाव पार्क चार आणि आंबेगाव येथून चार तक्रारी नोंदल्या आहेत.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेले आदेश आगामी काळातील कारवाईसाठी दिशादर्शक ठरतील, असा दावा मंचाने केला आहे.
Related
Articles
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
गुंजाळवाडीत बैलपोळ्याचा शाही थाट
11 Oct 2026
आधी नियोजन, आता निधी कपात; जिल्हा परिषदेत सदस्यांची कोंडी
13 Oct 2026
वाचक लिहितात
08 Oct 2026
राहुल यांनी गैरवर्तन केल्याचा गर्भवती पत्रकाराचा आरोप
14 Oct 2026
लावणीच्या रंगमंचावरची तेजस्वी ज्योत
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात