होर्मुझ खुली करण्याचा इराणचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचा इराणचा प्रस्ताव फेटाळला आहे. महाविद्यालयीन फुटबॉल सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी शनिवारी व्हाइट हाऊसबाहेर ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
दरम्यान, या आठवड्यात इराणने दिलेल्या प्रस्तावानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रस्तावानुसार, अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवल्यास, इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंध माफ केल्यास आणि लेबानानचा समावेश असलेल्या युद्धविरामाचे पालन केल्यास, इराण सात दिवसांत सामुद्रधुनी पुन्हा सुरू करून आपल्या अणुकार्यक्रमावरील चर्चा पुन्हा सुरू करेल. असे म्हटले होते.

होर्मुझ नव्हे ट्रम्प सामुद्रधुनी

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझचे नामकरण केले आहे. त्या अंतर्गत नकाशा प्रसिद्ध करुन त्याला आता ट्रम्प सामुद्रधुनी असे ओळखले जाईल, असे सांगितले आहे. इराणने युद्ध थांबविण्यासाठी सात अटींचा प्रस्ताव पाठवला होता. फेटाळून लावताना होर्मुुझी ही अमेरिकेची आहे. आणि तिचे नामकरण ट्रम्प सामुद्रधुनी असे करत असल्याचे जाहीर केले आहे. 

Related Articles