अमेरिका आणि बांगला देशात नागरी अणु सहकार्य करार   

न्यूयॉर्क : अमेरिका आणि बांगला देश यांनी नागरी अणु सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या माध्यमातून शांततापूर्ण अणुऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांत सामंजस्य वाढण्यास चालना मिळणार आहे. 
 
न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी बांगला देशाचे पंतप्रधान तारीक रहमान यांचे वैज्ञानिक अणि तंत्रज्ञान सल्लागार रेहान असद आण अमेरिकेचे  आर्थिक विकास, ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री जॅकोब हेलबर्ग यांनी सामंंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. याबाबतची माहिती बांगला देश पीपल्स पार्टीच्या प्रवक्त्याने दिली.  करारामुळे अणुऊर्जा निर्मितीच्या दीर्घकालीन योजनांना मदत मिळणार आहे. सध्या रुपपूर येथे बांगला देशाचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प तयार होत आहे. त्यासाठी अणु विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सहकार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरुन प्राप्त होण्यास चालना मिळणार आहे.  तसेच करारामुळे अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा, अणुऊर्जा तंत्रज्ञान बांगला देशाला प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
 

Related Articles