E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रसायनाचा कंटेनर उलटला
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी दुपारी रसायन सदृश्य पदार्थाची वाहतूक करणार्या कंटनरने दोन मालवाहू कंटेनरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन कंटेनर उलटले. तर एकाचा चक्काचूर झाला असून दोन जण जागीच मृत्यू झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दुपारी ही दुर्घटना घडली. मुंबईकडे जाणार्या मार्गाकडेवर खोपोली हद्दीतील किलोमीटर ३६ जवळ ही दुर्घटना घडली.
तीव्र उतारावर फेविकॉल सदृश्य रसायनाची वाहतूक करणार्या कंटेनरचा अचानक ब्रेक निकामी झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने आधी अन्य वाहनाला धडक दिली. त्यानंतर तो दुसर्या कंटेनरवर जाऊन आदळला.
एका मालवाहू कंटेनरमध्ये नव्या कोर्या मोटारी व तर दुसर्या एका कंटेनरमध्ये पुठ्ठा भरला होता. फेविकॉल सदृश्य रसायनाची वाहतूक करणार्या कंटेनरसह इतर वाहनेही उलटली. ती रस्त्याच्या कडेला उलटली होती. त्यामुळे रस्त्यावर फेविकॉल सदृश्य पदार्थ सांडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. महामार्ग पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्यावरील फेविकॉल सदृश्य पदार्थ हटवण्याचे काम हाती घेण्यात आले.
Related
Articles
बिबट्यांचा मुक्त संचार...
12 Oct 2026
भारतातील भूजलात सतत घट
13 Oct 2026
आलेगाव पागा तलावात पाणी सोडण्याची मागणी; ग्रामस्थ आक्रमक
09 Oct 2026
पुणे बुक फेअरचे प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
08 Oct 2026
जीएसटी अधिकार्यांचे अटकेचे अधिकार रद्द
09 Oct 2026
केतन हत्याकांड प्रकरणातील डिजिटल पुरावे एकत्र
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात