E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन; सव्वादोन कोटींचे डॉल्बी साहित्य जप्त
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
सातारा, (प्रतिनिधी) : गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर डॉल्बी सिस्टीमचा वापर तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी १५ गणेश मंडळांवर कारवाई केली. या कारवाईत शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे २ कोटी २५ लाख रुपये किमतीचे डॉल्बी साहित्य आणि वाहने जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीपूर्वी शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी गणेश मंडळे तसेच डॉल्बी मालकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून नियमांचा भंग झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे, तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि शाहूपुरीच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ आणि सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, अशा एकूण १५ गणेश मंडळांसह संबंधित डॉल्बी मालक आणि ट्रॅक्टर-मालमोटार चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय शिवराय मित्र मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक मंडळ, शाहूपुरी गणेश मंडळ, विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता, श्रियश गणेशोत्सव मंडळ, सुयोग मंडळ, एकता मंडळ, बालस्मृती मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, शिवनगर मंडळ आणि शिवतेज मंडळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाल गणेश मंडळ, अजिंक्यतारा मंडळ आणि भोसलेनगर मंडळावर कारवाई करण्यात आली.
Related
Articles
संत तुकाराम नगरमध्ये म्हाडाच्या पार्किंगवर गाळेधारकांचा कब्जा
09 Oct 2026
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये 15 जणांचा मृत्यू
11 Oct 2026
प्रामाणिक उमेदवारांच्या नियुक्त्या रखडवू नका
11 Oct 2026
योगी आणि यादव यांची नुरा कुस्ती : ओवेसी
14 Oct 2026
नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या
08 Oct 2026
डेन्मार्क ओपन स्पर्धा
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात