E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
उमेदवाराने पक्ष सोडल्याने जनसुराज्य पक्षाला झटका
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
बिहार विधान परिषद निवडणूक
पाटणा : बिहार विधान परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या ’जन सुराज’ पक्षाला मोठा राजकीय झटका बसला आहे. पक्षाने तिरहुत शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले भूषण कुमार झा यांनी जन सुराज पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची घोषणा केली आहे.
पक्षाचा राजीनामा देताना भूषण झा यांनी प्रशांत किशोर आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रचार बैठकीदरम्यान वक्तव्य करण्यावर बंधने आणली गेल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाषणाचे रेकॉर्डिंग करण्यास मज्जाव केला आणि प्रशांत किशोर यांना हवे तेच बोलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे आपल्यासोबत आलेल्या शिक्षक सहकार्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
बिहार विधान परिषदेच्या एकूण ८ जागांसाठी (४ पदवीधर आणि ४ शिक्षक मतदारसंघ) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच जन सुराज पक्षातील अंतर्गत नाराजी आणि उमेदवाराने दिलेला राजीनामा यामुळे प्रशांत किशोर यांच्या पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
नवा उमेदवार रिंगणात
भूषण झा यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे जन सुराज पक्षाने प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी तातडीने बैठक घेऊन तिरहुत शिक्षक मतदारसंघातून श्याम नंदन यादव यांना नवे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. या अनपेक्षित घडामोडीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Related
Articles
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी
09 Oct 2026
दोन हजार 578 ग्राहकांनी घेतला सूर्यघर योजनेचा लाभ
14 Oct 2026
येरवडा भाजी मंडई परिसरातील विनापरवाना टपर्या, हातगाड्या जप्त
13 Oct 2026
पुणे बुक फेअरचे प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
08 Oct 2026
वाचक लिहितात
13 Oct 2026
वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन; जलसाठ्याच्या वापरावर निर्बंध
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात