डेहराडून : भरती परीक्षेतील कथित अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. त्यासाठी ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) डेहराडून येथील कार्यालयात दाखल झाले. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी चौकशीबाबतची एक चित्रफीत प्रसारीत केली. त्यामध्ये म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वीच चौकशीसाठी हजर राहण्याबाबत ईडीची नोटीस मिळाली होती.
Fans
Followers