E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कबड्डीमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष संघाचे नववे, महिला संघाचे चौथे विजेतेपद
नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये भारताचे वर्चस्व कायम राहिले. पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी शनिवारी अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी इराणचा पराभव करत आपल्या सुवर्णपदक यशस्वीपणे राखले. पुरुष संघाने ४०-३४, तर महिला संघाने ३७-३४ असा रोमहर्षक विजय नोंदविला. पुरुषांचे हे आशियाई स्पर्धेमधील नववे, तर महिलांचे चौथे सुवर्णपदक आहे.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू पवन सेहरावतला मॅटवर उतरण्याची गरज पडली नाही. मध्यंतराला इराण १८-१७ असा आघाडीवर असताना अर्जुन देशवाल आणि देवांक यांनी संयमी खेळ करत निर्णायक क्षणी भारताला आघाडी मिळवून दिली. भारताने ऑलआउट करत आघाडी २९-२४ अशी वाढवली. त्यानंतर भारतीयांनी जोखीम न घेता खेळाची गती नियंत्रित ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
सेहरावतने सामन्यानंतर सांगितले की, मध्यंतरानंतर केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंवर वर्चस्व गाजवू शकणार्या रेडर्सना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली. देशवाल आणि देवांक यांनी ही भूमिका प्रभावीपणे पार पाडली. बचावातही भारताने सुधारणा केली आणि इराणच्या रेडर्सना सहज गुण मिळू दिले नाहीत. महिला संघानेही दबावाच्या सामन्यात संयम राखत चौथे सुवर्णपदक पटकावले. २०१० च्या ग्वांग्झू आशियाईमध्ये महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारताने २०१८ च्या जकार्ता स्पर्धेचा अपवाद वगळता प्रत्येक आशियाईमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. जकार्तामध्ये अंतिम सामन्यात भारताला इराणकडून पराभव पत्करावा लागला होता. महिला अंतिम सामन्यात भारताने मध्यंतराला २२-१६ अशी आघाडी घेतली. मात्र, दुसर्या सत्रात इराणने जोरदार पुनरागमन करत फरक २६-२७ असा एका गुणावर आणला. त्यानंतर भारतीय बचावफळीने संयमी खेळ केला. संजूने दोन गुण मिळवत आघाडी वाढवली, तर पुष्पा राणाने दमदार टॅकल करत भारताला ३४-२८ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर इराणने अंतर ३७-३४ पर्यंत कमी केले; मात्र भारताचा विजय रोखता आला नाही.
महिला कबड्डीत वर्चस्व
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कबड्डीचा समावेश २०१० च्या ग्वांग्झू आशियाईपासून झाला. २०१०, २०१४ इंचियोन, २०१८ जकार्ता-पालेमबांग, २०२२ हांगझोऊ आणि २०२६ नागोया अशा पाच आशियाईंमध्ये महिला कबड्डीचे सामने झाले.
या पाच स्पर्धांपैकी भारताने चार वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला केवळ २०१८मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्या वेळी अंतिम सामन्यात इराणने भारताचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. भारताने २०१०, २०१४, २०२२ आणि २०२६मध्ये सुवर्णपदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डीचा समावेश १९९० च्या बीजिंग आशियाईपासून करण्यात आला. त्यावेळी भारताने बांगलादेशचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर भारताने १९९४ हिरोशिमा, १९९८ बँकॉक, २००२ बुसान, २००६ दोहा, २०१० ग्वांग्झू, २०१४ इंचियोन आणि २०२२ हांगझोऊ आशियाईमध्येही सुवर्णपदक जिंकले. २०१८च्या जकार्ता-पालेमबांग आशियाईमध्ये मात्र भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. उपांत्य फेरीत इराणने भारताचा पराभव केला. त्यानंतर भारताने कांस्यपदक मिळवले, तर इराणने सुवर्णपदक पटकावले. आता २०२६ मध्ये इराणला अंतिम सामन्यात हरवत भारताने पुरुष कबड्डीत नवव्यांदा सुवर्णपदक जिंकले.
Related
Articles
डिझेल दरवाढीला बसणार लगाम
04 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी; कोरियन द्वीपकल्पात तणाव
04 Oct 2026
आलेगाव पागा तलावात पाणी सोडण्याची मागणी; ग्रामस्थ आक्रमक
09 Oct 2026
श्रेयसची टी-20 क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप
08 Oct 2026
तरुणाईच्या आंदोलनांनी सरकार बेजार
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान