हा माझा अखेरचा विश्वचषक : विराट   

तिरुवनंतपुरम : दिग्गज भारतीय फलंदाज विराट कोहलीने म्हटले आहे की, पुढील वर्षी होणारा वनडे विश्वचषक हा भारताकडून खेळणारा त्याचा अखेरचा विश्वचषक असेल. विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावणार असल्याचे कोहलीने सांगितले.
 
कोहली सध्या केवळ एका प्रकारात खेळत आहे. रविवारी येथून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या वनडे मालिकेपूर्वी ‘जिओस्टार’शी बोलताना त्याने आपल्या भवितव्याबाबत ही भूमिका मांडली. पुढील वर्षीचा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. कोहली म्हणाला, ‘‘भारताकडून खेळताना हा माझा अखेरचा विश्वचषक असेल आणि हीच माझी प्रेरणा आहे. मला माझे सर्वस्व पणाला लावायचे आहे. निश्चितच विश्वचषक जिंकणे हे लक्ष्य आहे आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.’ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११मध्ये विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा कोहली सदस्य होता.
 
नोव्हेंबरमध्ये ३८ वर्षांचा होणार्‍या कोहलीने सांगितले की, ५० षटकांच्या विश्वचषकाचे आव्हान आणि त्यातील दबाव अन्य कोणत्याही प्रकारापेक्षा अधिक असतो. तो म्हणाला, ‘‘आता तुम्हाला टी-२०च्या पातळीवरील तीव्रतेचे जवळपास १० सामने खेळावे लागतात. मात्र, एका दिवसात तुम्ही अडीच टी-२० सामन्यांइतके क्रिकेट खेळत असता. 

Related Articles