E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मॅरेथॉनमध्ये ४४ वर्षांनंतर पदक
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
सावनचा रौप्य पदकावर कब्जा
आयची-नागोया : सावन बरवालने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. त्याने २ तास ११ मिनिटे ३६ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. यामुळे मॅरेथॉनमध्ये ४४ वर्षांनंतर भारताला पदक मिळाले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमधील भारताचे हे एकूण चौथे पदक आहे.
यामाशिताचे सुवर्ण
जपानच्या २९ वर्षीय इचिटाका यामाशिताने २:१०:५१ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मॅरेथॉनमध्ये सुवर्ण जिंकणारा तो जपानचा सातवा खेळाडू ठरला. तसेच घरच्या भूमीवर या प्रकारात सुवर्ण जिंकणारा तो पहिला जपानी खेळाडू ठरला.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष मॅरेथॉनचे पहिले पदक १९५१ मध्ये जिंकले होते. छोटा सिंह यांनी सुवर्ण, तर सुरत सिंह माथुर यांनी कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर १९८२ मध्ये होसुर कुक्कप्पा सीतारन यांनी कांस्यपदक जिंकले. आता सावन बरवालच्या रौप्यपदकामुळे या यादीत आणखी एका ऐतिहासिक पदकाची भर पडली.
सिंह यांचा मोडला विक्रम
सावनने यंदाच्या एप्रिलमध्ये रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये २ तास १२ मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवणारा पहिला भारतीय ठरत शिवनाथ सिंह यांचा ४८ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीने त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आणखी सुधारला. ही त्याच्या कारकीर्दीतील केवळ दुसरी मॅरेथॉन होती.
Related
Articles
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन
13 Oct 2026
मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य
14 Oct 2026
श्रेयसची टी-20 क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप
08 Oct 2026
बँक ठेवी आणि शेअर्सची माहिती आता एकाच विवरणपत्रात
12 Oct 2026
लाज वाटायला हवी तुम्हाला...
11 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात