E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘केसरीवाडा गणेशोत्सवा’ची वैभवशाली मिरवणूक
Samruddhi Dhayagude
27 Sep 2026
पुणे : सनई-चौघड्यांचे मंगलमयी सूर, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह, ढोल-ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, डोळ्यात भरणारा ‘सुजलाम सुफलाम रथ’, फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान झालेले बाप्पा, ‘महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि आगरकर’ यांचा जिवंत देखावा, लाठीकाठी पथकाचा अंगावर शहारे आणणारा खेळ, मन प्रसन्न करणार शंखनाद आणि सर्वांचे लक्ष वेधणारी गजराजाची प्रतिकृती अशा उत्साही, आनंददायी आणि मांगल्यमय वातावरणात मानाच्या पाचव्या ‘केसरीवाडा गणेशोत्सवा’च्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने शुक्रवारी गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
ऐतिहासिक आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी केसरी गणेशोत्सवाची मिरवणूक यंदाही लक्ष्मी रस्त्यावरचे आकर्षण ठरली. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेला ‘सुजलाम सुफलाम‘ रथ कौतुकाचा विषय ठरला. महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शुक्रवारी दुपारी २ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक पाहण्यासाठी मंडईतील टिळक पुतळ्यापासून ते संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर दुतर्फा भक्तांची अलोट गर्दी झाली होती. पालखीत विराजमान ‘श्रीं’चे लोभस रूप डोळ्यात साठविण्यासाठी भक्तांच्या चेहर्यांवर आतुरता जाणवत होती.
मिरवणुकीसाठी खास आकर्षक सुजलाम सुफलाम रथ तयार करण्यात आला होता. तर, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने यंदा हुबेहुब गजराजाची प्रतिकृती साकारली होती. त्यामुळे हा गजराज गणेश भक्तांत चर्चेचा विषय ठरला. गजराज आणि रथ मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावर ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. लाडक्या गणरायाची मूर्ती दृष्टिपथास पडताच भक्तांचे हात आपोआप जोडले जात होते. तसेच, बाप्पांचे लोभस रूप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाई सरसावत होती. मिरवणुकीच्या सुरुवातीला बिडवे बंधूंचा सनई चौघडा होता. अभेद्य, शिवमुद्रा, श्रीराम या ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. इतिहास प्रेमी मंडळाने ‘महात्मा फुले यांच्याकडून टिळक व आगरकर यांचा सत्कार’ हा जिवंत देखावा सादर केला. यासोबतच, केशव शंखनाद पथकाचा मिरवणुकीत समावेश होता.
मिरवणूक मंडईतून बेलबाग चौकात दाखल होताच भक्तांनी गणरायाला हात जोडत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा एकच जयघोष केला. त्यामुळे भक्तिमय वातावरण आणखी उत्साही झाले आणि बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला. भक्तांच्या प्रोत्साहनामुळे पथकांतील वादकांचा उत्साह शिगेला पोहोचला. मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर येताच ढोल-ताशा पथकांनी शिस्तबद्ध व लयबद्ध केलेल्या वादनाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. विसर्जन मिरवणुकीत केसरीवाडा गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, रौनक रोहित टिळक, ‘केसरी’चे अधिकारी-कर्मचारी यांसह विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांसह सामाजिक व राजकीय पक्षाकडून उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाकडून मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांचा सन्मान करण्यात आला. गरुड गणपती चौकात मराठी चित्रपटातील कलाकारांनी डॉ. टिळक यांचा विशेष सत्कार केला. मिरवणूक कुलकर्णी पेट्रोल पंप येथे आली असताना भक्तांनी गणरायावर फुलांची उधळण केली. त्यानंतर मिरवणूक टिळक चौकात दाखल झाली. यावेळी ढोल-ताशा पथकाने केलेल्या वादनामुळे भक्तांचा जल्लोष द्विगुणित झाला. अनेकांनी ढोल-ताशांच्या वादनासोबत हात उंचावत ताल धरला. तसेच, उपस्थित भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’च्या केलेल्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात रौनक रोहित टिळक यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर गणरायाची विसर्जन मिरवणूक पांचाळेश्वर घाटाच्या दिशेने रवाना झाली. या ठिकाणी ‘श्रीं’ची आरती झाली. त्यानंतर, सायंकाळी ६.१० वाजता हौदामध्ये ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. हौदामध्ये गणपती विसर्जनाची परंपरा केसरीने यंदाही कायम ठेवली.
सुजलाम सुफलाम रथ ठरला आकर्षण
मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणरायाची विसर्जन मिरवणूक यंदा सुजलाम सुफलाम रथातून निघाली. या रथात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, दुसर्या बाजूला लोकमान्य टिळक यांच्या प्रतिकृती होत्या. तसेच, बैलजोडी, बैलगाडी, सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या व फळे रथावर ठेवण्यात आली होती. तसेच, दोन्ही बाजूने उसाचे ताट लावण्यात आले होते. या रथावर ’स्वराज्याची मुळे शेतात, शेतकर्यांच्या हातात’ आणि ‘शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध!’ असे स्लोगन लिहिण्यात आले होते. प्रारंभीपासून ते शेवटपर्यंत या रथाचे छायाचित्र टिपण्यासाठी भक्तांची झुंबड उडत होती.
विसर्जन मार्गावरील वेळा
मंडईतील टिळक पुतळा : दुपारी ०२.००
बेलबाग चौक
: दुपारी ३.०५
शगुन चौक
: सायं. ४.२७
विजय चित्रपटगृह चौक
: सायं. ५.००
टिळक चौक
: सायं. ५.४५
पांचाळेश्वर घाट
: सायं. ६.१०
लोकमान्य टिळक व आगरकरांचा महात्मा फुलेंकडून सत्कार
इतिहास प्रेमी मंडळातर्फे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमान्य टिळक व आगरकरांचा महात्मा फुलेंकडून सत्कार’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला. लोकमान्य टिळक आणि आगरकर हे डोंगरीच्या कारागृहातून सुटल्यानंतर त्यांचे सत्यशोधक समाजाच्या वतीने स्वागत महात्मा फुले यांनी केले होते, त्या प्रसगांवर आधारित हा देखावा होता. लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेत चिन्मय टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या वेशभूषेत भूषण पाठक आणि महात्मा फुले यांच्या वेशभूषेत सार्थक काशीद होते. या देखाव्याची संकल्पना इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांची होती.
Related
Articles
शरद पवार दुष्काळ पाहणीवर पुरंदर तालुक्यात शेतकर्यांशी संवाद
03 Oct 2026
युद्धनौकांना मदत करणार्या जहाजाचे जलावतरण
06 Oct 2026
दुष्काळासाठी महाराष्ट्राला भरीव मदतीची ग्वाही
08 Oct 2026
कॅनडाच्या लेखिका अॅन कार्सन यांना साहित्यातील नोबेल
09 Oct 2026
आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा सपकाळ यांचा आरोप
04 Oct 2026
न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान