नागप्रदेशात विषारी दारूचे दोन दिवसांत १९ बळी   

 

कोहिमा : नागप्रदेशातील कोकचुंग आणि तुएनसांग जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत विषारी दारु प्यायल्यामुळे किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. गेल्या तीन दशकांपासून नागप्रदेश ड्राय स्टेट’ (मद्यबंदी असलेले राज्य) घोषित आहे.
 
विषारी दारुमुळे मोकोकचुंग जिल्ह्यात आठ आणि तुएनसांगमध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ’पीटीआय’ने दिले आहे. या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी आणि संशयास्पद भेसळयुक्त दारूचा स्रोत व पुरवठा साखळी शोधून काढण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आय. बुंगलांग चांग यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक वेसुप्रा केझो यांनी सांगितले.
 

Related Articles