E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘एनसीएमसी’ कार्डचा पहिल्याच दिवशी बोजवारा
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
हजारो महिला, ज्येष्ठांचा पूर्ण तिकीटाने प्रवास
भोर, (वार्ताहर) : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससाठी मंगळवारपासून अनिवार्य केलेल्या ‘एनसीएमसी’ कार्डचा पहिल्याच दिवशी सर्वत्र बोजवारा उडाल्याचे आढळले. त्यामुळे हजारो महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी पूर्ण पैसे देऊन तिकीट काढावे लागले. यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहकांना अनेक सवलतधारी प्रवाशांचा रोषाला सासोरे जावे लागले.
भोरसह जिल्हा व राज्यात असाच प्रकार झाल्याचे येथील महामंडळाच्या एका अधिकार्याने सांगितले. काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भविले. महामंडळाने राज्यातील महिलांना व ६५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना प्रवास भाडयात पन्नास टक्के तर ७५ वर्ष पूर्ण झालेल्या महिला व पुरूषांना मोफत प्रवासाची योजना लागू आहे. सरकारच्या निर्देशानानुसार सवलतधारी तसेच विनासवलतधारी प्रवाशांना एनसीएमसी कार्ड देण्यात येत आहे. हे कार्ड ई-बिक्स टेक्नॉलॉजिक्स लिमीटेड यांचेद्वारे ठराविक रक्कम घेऊन देण्यात आली. त्यानुसार अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना नोंदणी केलेले कार्ड वितरित केले आहे. टप्याटप्याने इतर सवलतधारी प्रवाशांना कार्ड नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. मात्र कार्ड वितरित झालेल्या प्रवाशांसाठी मंगळवापासून ‘एनसीएमसी’ अनिवार्य केल्याचे पत्र महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी ३१ ऑगस्टला राज्यातील सर्व आगारांना पाठवले आहे.
त्यानुसार वाहकाच्या तिकीट वाटप मशिनमध्ये बदल केले. प्रत्यक्षात कार्ड मशिनला जोडल्यानंतर तिकीट येत नसल्यामुळे सवलतधारी प्रवाशांना पूर्ण तिकीटाचे पैसे देऊन प्रवास करण्याची वेळ आली. अनेकांजवळ पुरेसे पैसे नसल्याने प्रवास करता आला नाही. भोर आगारात फक्त चार सवलतधारी कार्डचे रिचार्ज झाले. बाकी एकाही लाभार्थीला कार्डचा लाभ मिळाला नाही. कार्डला एरर आहे, अॅक्टीव्ह नाही, रिचार्ज न होणे, सवलीतीचे तिकीट न येणे, सर्व्हर डाऊन असणे, दुर्गम भागात कोणत्याच नेटला रेंज नसणे अशा अडचणी वाहकाला येत होत्या.
Related
Articles
कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणार
08 Sep 2026
डीजे विरोधात पुणेकर रस्त्यावर
07 Sep 2026
सुथारचे सात बळी; वॉर्विकशायरचा हॅम्पशायरवर विजय
06 Sep 2026
आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
06 Sep 2026
शीतल देवीकडे भारताचे नेतृत्व
05 Sep 2026
इशान किशनची धडाकेबाज द्विशतकी खेळी
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार