E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पाण्याचे मोजमाप करण्यासाठी मीटर रिडींग सुरू करणार
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांची माहिती
पुणे
: शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे सुमारे 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाणी पुरवठ्याच्या 144 झोनपैकी 60 झोनमध्ये टाक्या, पाईपलाईन आणि मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या देखभाल दुरुस्तीसाठी एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याचे मोजमाप करण्यासाठी पुढील महिन्याभरात काही झोनमध्ये प्रायोगीक तत्वावर मीटर रिडींगचे काम सुरू करण्यात येणार असून डमी बिले तयार करण्यास सुरूवात करण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी आणि सर्व भागात चोवीस तास समान पाणी वाटप करण्याची सुमारे अडीच हजार कोटीची चोवीस तास पाणीपुरवठा योजना महापालिकेने हाती घेतली. 2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम 11 वर्षात 88 टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. या योजनेसाठी महापालिकेने पाण्याच्या दरात वाढ केली असून मीटरद्वारे पाण्याचा वापर निश्चित करुन गळती कमी करण्याचे नियोजन आहे. या योजनेअंतर्गत 83 पाण्याच्या टाक्या आणि सुमारे एक हजार कि.मी.च्या नवीन पाईपलाईन सोबतच पावणेतीन लाख पाणी मीटरही बसविण्यात येणार आहेत. परंतू जागेच्या अडचणीमुळे टाक्या आणि पाईपलाईनच्या कामाला प्रचंड विलंब झाला. तसेच अनेक ठिकाणी मीटर बसविण्यासही नागरिकांकडून विरोध होत असल्याने काम रेंगाळले आहे.
यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त कौर यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या 83 पैकी 63 टाक्या कार्यन्वीत झाल्या आहेत. येत्या 10 तारखेपर्यंत आणखी 16 टाक्या कार्यन्वीत होतील. काही ठिकाणी पाईपलाईनच्या कामासाठी जागा मिळविण्यात अडचणी येत आहेत, ते सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर मीटरलाही काही ठिकाणी विरोध होत असल्याने विलंब होत आहे. पाणी पुरवठयाच्या 144 झोनपैकी 60 झोनमधील सर्व कामे पुर्ण झाली आहेत. हे झोन्स मेन्टेनन्ससाठी हा प्रकल्प करणार्या एल ऍन्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आले आहेत. या 60 झोनमध्ये मीटर रिडींगची यंत्रणाही विकसित करण्यात येत आहे. पुढील महिन्यांत यापैकी काही झोनमध्ये प्रत्यक्षात मीटर रिडींग सुरू करण्यात येईल. तसेच बिले देखिल तयार करण्यात येणार आहेत, असे कौर यांनी सांगितले.
पुढील महिन्यापासून काही झोनमध्ये प्रायोगीक तत्वावर मीटर रिडींग घेउन बिले तयार करण्यात येणार आहेत. या बिलांवरून पाणी वापराचा अभ्यास करण्यात येईल. परंतू संपुर्ण योजना पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात आकारणी सुरू होईल.
- पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त
Related
Articles
साडेपाच टन मदतीचे साहित्य नेपाळकडे रवाना
02 Sep 2026
सेरेना-व्हिनस यांची झुंज अपयशी
06 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
निवडणूक कामकाजाचा कर संकलन विभागाला फटका; मालमत्ता कराच्या सेवांना विलंब
02 Sep 2026
जॉर्जिया मेलोनी यांचे मोदींकडून अभिनंदन
05 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार