E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटींची तरतूद
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्ह्याला सिंचनाचा लाभ
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मंजुरी देतानाच या प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी ५० लाखांच्या तरतुदीस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार आहे.
कुकडी पाटबंधारे प्रकल्प येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा संयुक्त प्रकल्प आहे. या पाच धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३०.५२ टीएमसी असून, प्रकल्पाचा पाणीवापर ३९.३६ टीएमसी इतका आहे. प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात टंचाईग्रस्त तालुक्यांतील एकूण १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
दरसूचीतील वाढ, जादा दराच्या निविदांची स्वीकृती, भूसंपादनाच्या खर्चातील वाढ, विशेषतः नवीन भूसंपादन कायद्यामुळे झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदल, नवीन अथवा वगळलेल्या तरतुदी, अपुर्या तरतुदी तसेच अन्य अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीने प्रस्तावाची छाननी केल्यानंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता.
बांधकामविषयक उच्चाधिकार समितीनेही प्रस्तावाची छाननी केल्यानंतर ५ हजार ७०४ कोटी ५० लाखांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मान्यता देण्याची शिफारस केली होती. मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये प्रत्यक्ष कामासाठी ४ हजार ९४६ कोटी २० लाख, तर अनुषंगिक खर्चासाठी ७५८ कोटी ३० लाखांचा समावेश आहे.
Related
Articles
बिहारमध्ये गंगेने ओलांडली धोक्याची पातळी
05 Sep 2026
सेरेना-व्हिनस यांची झुंज अपयशी
06 Sep 2026
श्री विठ्ठल मंदिरातील कृष्णजन्मोत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता
06 Sep 2026
राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरपाई द्या
04 Sep 2026
जर्मनीत स्फोटानंतर रेल्वे स्थानक बंद
03 Sep 2026
दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार