E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कर्मचार्यांची दादागिरी
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
तरूणाला बेदम मारहाण, अधिकार्यावर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी
येरवडा
: लक्ष्मी नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान महापालिकेच्या कर्मचार्यांकडून एका स्थानिक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्पेश अरूण लोखंडे असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, संबंधित दोषी अधिकार्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
येरवडा मधील लक्ष्मी नगर भागात प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना तेथील कर्मचार्यांनी कल्पेश लोखंडे याच्याशी हुज्जत घालत त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत कल्पेश गंभीर जखमी झाला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीच्या प्रकारामुळे येरवडा परिसरात प्रशासकीय अधिकार्यांची ’हुकूमशाही’ सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून मारहाण करणार्या कर्मचार्यांवर आणि जबाबदार अधिकार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
Related
Articles
आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
06 Sep 2026
शिरूर मतदारसंघात १ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली
04 Sep 2026
हनुमान अंश चित्रपटाचा १५० कोटींचा व्यवसाय
08 Sep 2026
निवडणूक न लढवताच सहा पक्षांच्या खात्यात १ हजार ५०० कोटी
07 Sep 2026
भारत-जपान यांच्यात प्रथमच टी-२० सामना
05 Sep 2026
चार पैकी एक जनधन खाते निष्क्रिय
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार