E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
पर्यावरणपूरक मूर्तींकडे वाढला कल; पारंपरिक रूपाला आधुनिक साज
पुणे
: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेशमूर्तींच्या बाजारपेठेत लगबग वाढली आहे. यंदा शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींना गणेशभक्तांकडून चांगली मागणी होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शाडूच्या मूर्तींच्या मागणी 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे पुणेकरांचा कल वाढल्याने शाडूच्या मूर्तींना विशेष पसंती मिळत आहे.
शहरातील विविध मूर्ती विक्री केंद्रांवर सध्या गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामध्ये शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. बाजारात साधारण नऊ इंचांपासून तीन फुटांपर्यंतच्या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. मूर्तींच्या आकारानुसार आणि कलाकुसरीनुसार त्यांच्या किमती 600 रुपयांपासून 21 हजार रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे यंदा मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्तींवर आकर्षक रंगकाम केले आहे. पारंपरिक तसेच आधुनिक रंगसंगतीचा वापर करण्यात आल्याने मूर्ती अधिक देखण्या दिसत आहेत. मुकुट, दागिने, वस्त्रांची नक्षी आणि चेहर्यावरील भाव यामध्ये बारकाईने काम करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदीसाठी येणार्या भक्तांचे लक्ष या मूर्तींकडे वेधले जात आहे.
शाडूच्या मातीला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व असल्याचे अनेक भाविक मानतात. त्याचबरोबर शाडूची माती नैसर्गिक असल्याने मूर्ती विसर्जनानंतर ती पाण्यात तुलनेने लवकर विरघळते. त्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून शाडूच्या मूर्तींकडे नागरिकांचा कल वाढत आहे. गणेशमूर्तींची वाहतूक करताना शाडूच्या मूर्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. या मूर्ती नाजूक असल्याने त्यांना धक्का लागू नये, यासाठी मूर्तिकार आणि विक्रेते काळजी घेत आहेत. कामगारांची कमतरता आणि वाहतुकीशी संबंधित अडचणी असतानाही गणेशोत्सवापूर्वी मूर्ती ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणपतींसाठी पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याकडे विशेष कल दिसून येत आहे. आकर्षक रंगरंगोटी, सुबक कलाकुसर आणि पर्यावरणपूरकता यामुळे शाडूच्या गणेशमूर्तींना बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कारखान्यात शाडूच्या मूर्त्या शिल्लक नसल्याचे चित्र शहरात आहे. उत्सव जवळ आला, तरी या मूर्त्यांना मागणी सुरूच असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत.
दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शाडूच्या मूर्तींच्या दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, कामगारांची वाढलेली मजूरी आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ झाली आहे. दरवर्षी 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होत असते. यंदा अधिकची वाढ झाली आहे. महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे मूर्त्यांचे दरही वाढत असल्याचे मूर्तीकार गणेश लांजेकर यांनी सांगितले.
शाडूच्या मूर्तीला प्राधान्य
गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे या मूर्त्यांना यंदा चांगली मागणी आहे. या मूर्त्यांची अनेक विक्रेत्यांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. त्यामुळे कारखान्यात जेवढ्या मूर्त्या तयार करण्यात आल्या होत्या, त्या सर्व मूर्त्यांची विक्री झाली आहे. गणपती जवळ आले, तरीही आणखी या मूर्त्यांना मागणी कायम आहे.
- गणेश लांजेकर, मूर्तीकार, कसबा पेठ.
Related
Articles
सोमेश्वर कारखान्यात पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’?
08 Sep 2026
मुंबई सहकारी मंडळावर ‘सहकार पॅनेल’चा झेंडा
05 Sep 2026
कोयना पूर्ण क्षमतेने भरले
03 Sep 2026
गणेशोत्सवात लेझर बंदीला पाठिंबा
04 Sep 2026
मणिपूर विधानसभेत प्रथमच कुकी आमदारांचा प्रवेश
02 Sep 2026
चिंध्या आणि फर्निचरच्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी रामटेकडीत प्रकल्प
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार