E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
काही भागांत दुष्काळाचे सावट
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर तूट निर्माण झाल्याचे वृत्त चिंता वाढवणारे आहे. विशेषतः सोलापूर (44 टक्के), हिंगोली (43 टक्के) आणि बीड (42 टक्के) या जिल्ह्यांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक असलेली तूट तेथील भीषण परिस्थितीची साक्ष देत आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या प्रदीर्घ ओढीमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट अत्यंत गडद झाले आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाच्या उर्वरीत चार आठवड्यांच्या काळातही या तूट असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची कोणतीही शक्यता नाही, तेथे केवळ हलक्या ते मध्यम सरी पडतील. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मोसमाच्या उर्वरीत काळात मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आणि त्यामुळे संभाव्य दुष्काळाची शक्यता पाहता शासनाने आतापासूनच दुष्काळी उपाययोजना, पीक विमा वाटप आणि पाण्याचे चोख नियोजन इत्यादी उपाययोजना सुरू करणे आवश्यक झाले आहे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व)
नागरिकांचीही जबाबदारी
मुंबईतील कचरा समस्येबाबत उच्च न्यायालयाने टिप्पणी केल्याचे वाचून वाईट वाटले. हल्ली उठसूठ प्रत्येक बाबतीत, न्यायालयाला यंत्रणांचे कान टोचावे लागावेत ते सरकार असो किंवा अन्य यंत्रणांसाठी शोभादायक नाही. मुळात महानगरपालिकेने प्रथम आपला ढिला कारभार सुधारला पाहिजे. उपनगरातील रस्त्यांवर कचर्याचे ढीग कायम साचलेले असतात. ते एक-दोन दिवस उचलले देखील जात नाही; मात्र राजकीय क्षेत्रातील अति महत्त्वाची व्यक्ती एखाद्या शहराला भेट देणार असेल, त्यावेळेसच तेथील कचर्याचे ढीग उचलले जातात व रस्ते चकाचक केले जातात. हे योग्य नव्हे. हा देखावा कशासाठी? वास्तविक पाहता, कचर्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊ नये व रोगराई पसरू नये म्हणून व नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, पालिकेने कचरा रोजच्या रोज हटवणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील, बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकणे, भिंतींवर पानाच्या पिचकार्या मारणे, कचराकुंडी असूनही कचरा कुंडीच्या बाहेर फेकणे हे प्रकार बंद केले पाहिजेत.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व)
पैठणी साडीवर बारकोड
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची आणि कलात्मक वारशाची ओळख असलेली पैठणी ही केवळ साडी नसून महाराष्ट्राच्या वस्त्रकलेचा अभिमान आहे. पैठणीला देशभरात मोठी मागणी आहे. मात्र, वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत बाजारात बनावट, अर्धवट किंवा कमी दर्जाच्या साड्या ‘पैठणी’च्या नावाखाली विकल्या जाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी पैठणीवर बारकोड आणि लोगो देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. खरी पैठणी तयार करण्यासाठी कारागिरांना मोठा वेळ, कौशल्य आणि मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अस्सल पैठणीची किंमतही तिच्या दर्जानुसार असते; परंतु ग्राहकाला खरी आणि बनावट पैठणी यातील फरक सहज ओळखता येत नाही. बारकोड आणि अधिकृत लोगोमुळे ग्राहकाला साडीची अस्सलता तपासणे सुलभ होईल, तसेच बनावट पैठणी विकणार्यांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनालाही शक्य होईल. मात्र, केवळ बारकोड लावून प्रश्न सुटणार नाही. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे, बारकोडची पडताळणी करणारी यंत्रणा सुलभ असणे आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
डीजेमुक्त गणेशोत्सव
समाजामध्ये जनजागृती व्हावी व देशातील सर्व नागरिक सर्व धर्म पंथाचे नागरिक एकत्र येऊन एकजुटीने राहावे, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली. त्यावेळी ढोल-ताशा. झांज, तुतारी अशा पारंपरिक वाद्यांचा वापर गणपती उत्सवामध्ये व इतर सणांच्या वेळेस केला जात होता; परंतु कालांतराने त्यात बदल केला गेला आणि मोठमोठे स्पीकर डीजे तसेच लेझर लाईट हे प्रकार सुरू झाले; परंतु हे डीजे स्पीकर लहान मुले तरुण पिढी तसेच ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला या सर्वांना हानीकारक ठरले असून आत्तापर्यंत अनेकांना विविध आजार विविध व्याधींना सामोरे जावे लागले आहे. डीजेच्या अति आणि कर्कश आवाजामुळे मानवी आरोग्यावर अत्यंत गंभीर दुष्परिणाम होतात. तसेच यातील तीव्र लेसर लाईट्समुळे डोळ्यांच्या पडद्याला हानी पोहोचते. इतके दुष्परिणाम या डीजे स्पीकरमुळे होत असतील, जनजागृती करून डीजेमुक्त सर्व सण साजरे करण्याची प्रथा सुरू करावी.
विजय आकुर्डेकर, पुणे
Related
Articles
नंदीग्रामसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
08 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
पाबळ-खैरेनगर-धामारी ’एमआयडीसी’ला तात्काळ स्थगिती
03 Sep 2026
डॉ. रुपनवर मृत्युप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करा
02 Sep 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रखर लेझर, बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी सांगवीतील गणेश मंडळाच्या अध्यक्षाला शिक्षा
05 Sep 2026
मंगळवेढ्यात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कडकडीत बंद
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
5
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार
6
गणेशोत्सव डीजेमुक्त करूया !