E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भारतीय नागरिकांमुळे विकास दराचा विक्रम
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक; सातत्य ठेवण्याचे आवाहन
नवी दिल्ली : जागतिक अशांतता, भूराजकीय संघर्ष आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी अशा परिस्थितीत भारताचा विकास दर ७.८ टक्के झाल्याचा पराक्रम विशेष प्रभावी असल्याचे मत पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. त्याचे श्रेय त्यांनी तमाम भारतीय नागरिकांना मंगळवारी दिले.
पश्चिम आशियातील युद्धावरून आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जात असतानाही, भारताच्या अर्थव्यवस्थेने एप्रिल-जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे ७.८ टक्के दराने वाढ नोंदवून आपली लवचिकता सिद्ध केली आहे त्या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. विकास दराच्या कौतुकाची एक चित्रफीत मोदी यांनी प्रासारीत केली आहे. त्यात राहुल गांधी यांना फटकारले आहे त्यांच्या छात्रो की गुंजची खिल्ली उडविताना त्या कार्यक्रमाचे वर्णन त्यांनी जूट की गुंज असे केले. विकास दराची आकडेवारी पाहता भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खोटे कथन करणार्यांचा बुरखा टराटरा फाटल्याचे ते म्हणाले. विकासात आणि कामात यापुढेही सातत्य ठेवत वाटचाल करावी. त्याद्वारे आत्मनिर्भर आणि स्वदेशीसाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सातत्पूर्ण विकासाची कास कायम ठेवली पाहिजे., अशीच वाटचाल पुढे सुरू ठेवावी. त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी प्रकट केला. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेसाठी सातत्याने लक्ष केंद्रीत करावे, असा आग्रह धरताना मोदी म्हणाले, स्वातंत्र्यांच्या शताब्दी वर्षात विकासित देश तरुणांच्या हातात जाईल, असे कार्य केले पाहिजे.
या नागरिकांना मौलिक सल्ले
भारतीय नागरिकांनी परदेश दौरे टाळावेत आणि तेथील विवाह सोहळे नकोत, अनावश्क सोने खरेदी करु नका, विवाह सोहळे देशातच आयोजित करा, असा सल्ला मोदी यांनी पुन्हा दिला आहे. २०२० मधील कोरोना संकटाची आठवण त्यांंनी करुन दिली. त्या काळात संपूर्ण जगात अनिश्चितता होती. पण अशा कठीण काळातही भारताने प्रगती सुरू ठेवली होती. दुसरीकडे नागरिकांमध्ये जूट की गुंजद्वारे आणि खोट्या कथनाचा प्रसार जोमाने केला जात आहे. त्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. जग आजही अस्थिरता आणि पुरवठा साखळीच्या चिंतेने ग्रासले असताना भारताच्या विकास दराने चांगली झेप घेतली आहे. सरकारची धोरणे आणि हेतुही चांगला आहे त्यामुळे देश प्रगतीपथावर आहे, असे ते म्हणाले.
विकास दर ७.८ टक्के झाल्याबद्दल मी तमाम भारतीय नागरिकांचे अभिनंदन करतो. नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही बाब साध्य झाली युद्ध, जागतिक अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययातही भारताने विकासाच्या दराचा मैलाचा टप्पा गाठला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Related
Articles
ओबीसींच्या हिताला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरणार : भुजबळ
05 Sep 2026
असंघटित कामगारांची १५ हजार घरे तयार
08 Sep 2026
शिरूर मतदारसंघात १ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली
04 Sep 2026
गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांसाठी दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार
07 Sep 2026
अमृतसर विमानतळावर ड्रोनच्या घिरट्या
07 Sep 2026
नंदीग्रामसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार