सोन्याचे दर घसरले   

नवी दिल्ली : सोन्याचे दर सोमवारी सहा हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सराफी बाजारात पुन्हा अस्थिरतेचे वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि ’फेडरल रिझर्व व्याज दराबाबत कोणता निर्णय घेते ? याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे. पर्यायाने ते सोने आणि चांदी सारख्या किंमती धातूच्या खरेदी करताना तूर्त तरी सावधगिरीने पावले टाकत असल्याचे तज्ज्ञांनी सांंगितले.राजधानी दिल्लीत काल २२ कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर १ लाख ४४ हजार २०० रुपये झाला. २४ कॅरेटचा दर  १ लाख ५६ हजार ७७७ रुपये होता. उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये चांदीचा प्रति किलोचा दर २ लाख ७१ हजार ९०० रुपये होता. त्यापूर्वी  दर २ लाख ७२ हजार प्रति किलो होता. 
 

Related Articles