E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ उद्ध्वस्त
तेहरान : होर्मुुझ सामुद्रधुनीच्या वर्चस्वावरुन अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे. जुलैनंतर प्रथमच अमेरिकेच्या सैन्याने होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील इराणच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. त्याला इराणने उत्तर देत जॉर्डनवर प्रति हल्ला केला.
इराणच्या लारक बेटावरील दोन ’माइन लाँचर्स’वर (सुरुंग डागणार्या यंत्रणांवर) अमेरिकेच्या सैन्याने प्रतिबंधात्मक कारवाईचा दावा करत हल्ला केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांत पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ’इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने दिला आहे.
दरम्यान, इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा आहे. विशेषतः जॉर्डनमधल्या अमेरिकन तळांवरील हल्ल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इराणने ‘डान्सिंग मिसाइल’ किंवा ‘झिगझॅग मिसाइल’ अर्थात हवेतून जाताना मार्ग बदलणारी क्षेत्रणास्त्रांचा हल्ल्ययासाठी वापर केला आहे.
यूएईने इराणचे ड्रोन पाडले
संयुक्त अरब अमिरातने इराणचे एक ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. आमच्या हद्दीत घिरट्या घालणारे किंवा हल्ल्याच्य तयारीत असलेले ड्रोन पाडले आहे, अमिरातीच्या सैन्य दलाने सांगितले. जॉर्डन नंतर आमिरात इराणचे लक्ष्य असल्याचे ड्रोनच्या हालचालीवरुन स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले.
Related
Articles
गणरायाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी मखरांची सजावट
05 Sep 2026
शेअर बाजार घसरला
07 Sep 2026
भारतीय संघात पुन्हा परतणार
08 Sep 2026
सिक्कीममध्ये दरड कोसळली
07 Sep 2026
ट्रम्प यांचे खास दूत कीव्हमध्ये
07 Sep 2026
भारत-जपान यांच्यात प्रथमच टी-२० सामना
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार