E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बेपत्ता नागरिकांची संख्या चार हजारांहून अधिक
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
काठमांडू : नेपाळमधील महापुरातील बळींची संख्या सोमवारी ९०३ वर पोहोचली. तर, बेपत्ता नागरिकांची संख्या ४,२४७ वर पोहोचली, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
नेपाळ-तिबेटच्या सीमेवर मागील आठवड्यात हिमनदीचा मोठा भाग कोसळला होता. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. मागील सहा दिवसांपासून शोध कार्य सुरू आहे. रविवार सायंकाळपर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे ९,५०० नागरिकांची सुटका करण्यात आली. यामध्ये स्थानिक नागरिकांसह भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, इटली, माल्टा, तुर्की, स्वित्झर्लंड आणि पोर्तुगाल आदी देशांतील पर्यटकांचा समावेश आहे.
चितवान जिल्ह्यात सर्वाधिक २०७ मृतदेह हाती लागले आहेत. नवलपरासी पश्चिममधून १५१, गोरखा जिल्ह्यातून ६२, नुवाकोटमधून ९५, धाडिंगमधून ५५, तनहूमधून ३७, रसुवामधून २४ मृतदेह सापडले आहेत. प्रशासनाकडून बेपत्ता नागरिकांची आकडेवारी गोळा केली जात आहे. बेपत्ता नागरिकांची संख्या ४,२७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ९९ सुरक्षा कर्मचारी आणि ५९१ नागरिकांचा समावेश आहे.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. या महापुरात अनेक शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली आहेत. महापुरात घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. तसेच, जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पुरामध्ये तिबेटमध्ये १६ जणांचा बळी घेतला आहे. तर, ५५० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे चिनी प्रसारमाध्यमांनी दिली.
बेपत्ता नागरिकाचे नातेवाईक नेपाळमधील रुग्णालयांत गर्दी करत आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून रुग्णालयांच्या भिंतीवर छायाचित्रे लावण्यात आली आहे. ज्या मृतांची ओळख पटू शकली किंवा ओळख पटविण्यापलीकडील आहेत, त्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली. दरम्यान, डीएनए विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या १८ जणांचे १८ सदस्यांचे न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक नेपाळमध्ये दाखल झाले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
जलविद्युत प्रकल्पातील ९३३ जण अद्याप बेपत्ता
नेपाळमधील महापुरात अनेक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून, अद्याप ९३३ कामगार बेपत्ता आहेत. या कामगारांचा २६ ऑगस्टपासून बचाव पथके शोध घेत आहेत. मात्र, अद्याप बेपत्ता कामगारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. बहुतांश कामगार बोगद्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. या मोहिमेत बचाव पथकांना भारत आणि चीनमधील तज्ज्ञ पथके मदत करत आहेत.
नेपाळ-तिबेट सीमेजवळ मागील आठवड्यात हिमनदीचा मोठा भाग कोसळला. त्यात ९०० हून अधिक जणांचा बळी गेला असून, साडेचार हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत.
पूरग्रस्त भागातील विविध जलविद्युत प्रकल्पातील ९३३ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. तर, २७९ कामगारांची बोगद्यातून सुटका करण्यात आली आहे. यामध्ये ’अप्पर त्रिशुली-१’ मधील २५४ आणि ’लाङटांग खोला’ प्रकल्पातील १८ जणांचा समावेश आहे. ’अप्पर त्रिशुली-१’ जलविद्युत प्रकल्पातील ५०० हून अधिक कर्मचारी, कामगार आणि अभियंते अजूनही संपर्काबाहेर आहेत. त्यापैकी सुमारे ४०० जण बोगद्यांमध्ये अडकल्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. ’अप्पर त्रिशुली-३बी’ प्रकल्पातील २१३, ’रसुवागढी’ प्रकल्पातील ९३, ’अप्पर त्रिशुली ३ए’ आणि ’लाङटांग खोला’ प्रकल्पातील प्रत्येकी ४२, ’मेलुंग खोला’ प्रकल्पातील सात, ’रसुवा-भोटेकोशी’ प्रकल्पातील चार आणि ’मिडल त्रिशुली’ प्रकल्पातील दोन कामगार बेपत्ता आहेत.
Related
Articles
अनाहत आणि रमितचा विजय
03 Sep 2026
चिंध्या आणि फर्निचरच्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी रामटेकडीत प्रकल्प
03 Sep 2026
लष्कराची नौका उलटली
03 Sep 2026
डीजेच्या वादात पडू नका; गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा
01 Sep 2026
जनसंपर्काने जीडीपी चमकेल,पण अर्थव्यवस्था नाही!
03 Sep 2026
रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी भारत मदतीस तयार : जयशंकर
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?