केंद्र सरकारच्या अर्जावर आज सुनावणी   

केंद्र सरकारच्या अर्जावर आज सुनावणी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे दाखल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
 
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्यासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आहे. केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आंदोलकांवरील गुन्ह्यांसंदर्भात कलम १४२ आधारे अर्ज दाखल केला आहे. यावर संबंधित अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यावर, न्यायालयाने आर्ज सुनावणीस तयारी दर्शवली. कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) २० जुलै रोजी ‘चलो संसद’ मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. 

Related Articles