E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात २ कोटी ६ लाख मतदारांची नावे वगळली!
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
मुंबई,(प्रतिनिधी) : मतदार यादी विशेष पडताळणी मोहीम (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण करून राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे बघून ३० सप्टेंबर पर्यंत त्यावर हरकती सूचना देता येणार असून, ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. ज्याचे नाव प्रारूप यादीत आलेले नाही अशा पात्र मतदारांना, तसेच वयाची १८ वर्ष पूर्ण करणार्या नवमतदारांना १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, राज्याच्या सर्व मतदारसंघांच्या मतदार यादीची विशेष पडताळणी केली जात आहे.
या प्रक्रियेतील नव्या वेळापत्रकानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. मागच्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीतील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे नव्या प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. एसआयआरपूर्वी ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. एसआयआर प्रक्रियेनंतर प्रारुप यादीतील मतदारांची संख्या ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ झाली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ इतकी आहे. तर, स्त्री मतदारांची संख्या ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० इतकी आहे. मतदार यादीतून दोन कोटी सहा लाख मतदार विविध कारणांमुळे वगळले गेले आहेत. त्यात मतदार यादीत देण्यात आलेल्या निवासाच्या पत्त्यावर मतदार आढळून न येणे, त्या ठिकाणावरून अन्यत्र स्थलांतरित झालेले असणे, मतदाराचा मृत्य झालेला असणे, अन्यत्र नोंदणी झाल्याने दुबार नाव येणे, गणना फॉर्म भरून देण्यास नकार देणे आदी कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
आधी हरकत,नंतर नाव नव्याने नोंदवण्याची संधी
ज्यांचे नाव कोणत्याही कारणाशिवाय वगळण्यात आले आहे त्यांना ३१ ऑगस्टपासून ३० सप्टेंबर पर्यंत आपला दावा किंवा हरकत सादर करता येणार आहे. या दाव्यांची निस्तरण प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. तुमचे नाव प्रारूप यादीत नसेल तर पुन्हा नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘ड्राफ्ट रोल’मध्ये आधी आपले नाव तपासा. तिथे नाव नसेल तर मग तुमची हरकत किंवा दावा सादर करावा लागेल.
यादीत नाव नसले तरी चिंता नको; पुन्हा नोंदणी करता येईल
एसआयआर २०२६ मध्ये आतापर्यंत सुमारे २ कोटी ७ लाख नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली असली तरी ते कायमचे बाद झाले, असा त्याचा अर्थ नाही. पात्र मतदारांना पुन्हा अर्ज करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी सांगितले. मतदारांनी प्रथम प्रारुप मतदार यादी तपासावी. तुमचे नाव त्यात आहे का आणि तुमचे तपशील बरोबर आहेत का, हे तपासा. नाव नसल्यास, समावेशासाठी अर्ज करा. काही चूक असल्यास, दुरुस्तीची मागणी करा. नाव वगळण्याशी संबंधित काही मुद्दा असल्यास, फॉर्म ६ भरून तुमचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता. प्रारुप ही अंतिम यादी नाही. अंतिम मतदार यादीपूर्वी दावे आणि हरकतींची संपूर्ण प्रक्रिया केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वगळण्यात आलेल्या दोन कोटी मतदारांपैकी ७५ लाख ५२ हजार मतदार त्या पट्ट्यावर अनुपस्थित आढळले. ७६ लाख ८० हजार मतदार तेथून कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. ३४ लाख ८१ हजार मतदार मृत झाले असल्याचे आढळून आले. १७ लाख ६३ हजार मतदारांनी आधीच अन्यत्र नोंदणी केलेली आहे किंवा दुबार मतदार आहेत.
मतदार यादीतून वगळलेले मतदार
पुणे : २८,६६,४८१
ठाणे : २८,५९,३७७
मुंबई उपनगर : २६,५८,२०२
नागपूर : १४,४३,२६७
मुंबई शहर : ९,५०,७२०
अहिल्यानगर : ४,२६,९१५
सोलापूर : ६,२२,६७१
सांगली : ३,८२,२६९
सातारा : ३,४१,९०५
कोल्हापूर : ४,४९,२१३
Related
Articles
अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र भासविण्याचा सरकारचा प्रयत्न
04 Sep 2026
पुरवठा विभागाचा साठेबाजांना इशारा, १० टनांपेक्षा जास्त साखर आढळल्यास कारवाई
31 Aug 2026
दहशतवाद मुक्त प्रदेश हाच द़ृष्टिकोन : मोदी
30 Aug 2026
व्हॉट्सऍप कट्टा
31 Aug 2026
‘रेज ऑफ बिलीफ’ची भांडवल उभारणी : हेतु सामाजिक, मात्र नफ्याचा उद्देश
31 Aug 2026
जीएसटी संकलन घटले
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?