E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
धोम आणि तारळी धरण १०० टक्के भरले
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
कोयना ९८.७२ टक्क्यांवर
सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील धोम व तारळी धरणे १०० टक्के भरली असली तरी कोयना धरणातील पाणी पातळी ९८.७२ टक्क्यावर आहे. तर जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी पातळी २७ टक्क्यावर आहे. धरणातील पाणी पातळी समाधानकारक झाली असल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली. सध्या धरण परिसरात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी प्रमाणात होत आहे.
कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा ९८.८४० टीएमसी असून, धरण ९८.७२ टक्के भरले आहे. धरणात ६ हजार ७९० क्युसेक पाण्याची आवक होत असून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग विद्युत गृहातून सुरू आहे.
धोम धरणात सध्याचा उपयुक्त पाणीसाठी ११.६९० टीएमसी असून धरण १०० टक्के भरले आहे. धरणात ४ हजार ३७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून २ हजार ७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धोम बलकवडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ३.८७० टीएमसी असून धरण २७.७३ टक्के भरले आहे. धरणात ४५८ क्युसेक पाण्याची आवक होत असून ३३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कण्हेर धरणा उपयुक्त पाणीसाठा ९.२५० टीएमसी असून धरण ९६.४५ टक्के भरले आहे. धरणात ८५८ क्युसेक पाण्याची आवक होत असून ३४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूआहे. उरमोडी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९.३७० टीएमसी असून धरण ९७.१० टक्के भरले आहे. धरणात ३०० क्युसेक पाण्याची आवक होत असून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तारळी धरणात उपयुक्त पाणीसाठा ५.८४० टीएमसी असून धरण १०० टक्के भरले आहे. धरणात ८९२ क्युसेक पाण्याची आवक होत असून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी २७.०७ टक्के, नेर ७५.५२ टक्के, राणंद ०.४४ टक्के, आंधळी २६.३४ टक्के, नागेवाडी १००.४८ टक्के, मोरणा ९३ टक्के, उत्तरमांड ६८.८४ टक्के, महू ८०.०९ टक्के, हातगेघर ४६ टक्के, वांग मराठवाडी ७३.१६ टक्के पाणी आहे.
कोयनेच्या नदीपात्रात वीजगृहातून विसर्ग
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे. दरम्यान, धरण व्यवस्थापनाने नदीकडेच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Related
Articles
बळींची संख्या १,३५५ वर
08 Sep 2026
झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’
04 Sep 2026
सीताफळाच्या दरात वाढ
08 Sep 2026
मणिपूर विधानसभेत प्रथमच कुकी आमदारांचा प्रवेश
02 Sep 2026
पूर्व झोन दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
02 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार