E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची रीघ
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
लेण्याद्री, (वार्ताहर) : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथील गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. संकष्टी चतुर्थी व श्रावणी सोमवारमुळे भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने सकाळी ०६.१५ वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमीत्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले.
संकष्टी चतुर्थी व श्रावणी सोमवारमुळे भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ, शिवेचीवाडी यांचे संगीत भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली.
Related
Articles
हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश करा
05 Sep 2026
ठेकेदार बदलला तरी देवळाली प्रवरातील घाणीचे चित्र जैसे थे
07 Sep 2026
एमबीबीएस, बीडीएसच्या पहिल्या फेरीत 75.15 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश
07 Sep 2026
अमेरिकेचा ‘व्हिसा अटॅक’; भारतीय प्रवाशांवर परिणाम
05 Sep 2026
भारतीय इंग्रजी कविता आणि निस्सिम इझेकील
06 Sep 2026
कोलकात्यातील तृणमूलच्या कार्यालयावर हल्ला
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार