E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कास फुलोत्सवास आजपासून प्रारंभ
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
दिवसाला ३ हजार पर्यटकांना प्रवेश
सातारा, (प्रतिनिधी) : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कास पुष्प पठारावरील यंदाच्या फुलोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पठारावर चवर फुलले असून तेरडा, सीतेचे आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प, कुमोदिनी फुलांचा बहर दिसू लागला आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि फुलांचे संवर्धन लक्षात घेऊन यंदा दररोज केवळ ३ हजार पर्यटकांनाच ऑनलाईन प्रवेश दिला जाणार आहे. शनिवार, रविवार तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार असून, थेट येणार्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.
फुलोत्सवासाठी पर्यटकांना www.kas.ind.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये पार्किंगच्या ठिकाणापासून पठारापर्यंतची बससेवा मोफत असणार आहे. प्रत्येक ग्रुपला परिसराची माहितीपत्रिकाही देण्यात येणार आहे. एकीव वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. तसेच कुमुदिनी तलाव वॉच टॉवरवरून कास तलाव परिसराचे दर्शन घेता येणार आहे.
मंडपघळ ठरणार नवे आकर्षण
कास पठारासोबतच परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात येत आहे. त्यामध्ये मंडपघळ हे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. दर्याखोर्यांचे विहंगम दृश्य, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेमुळे मंडपघळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. दरम्यान, कास पठारावर येणार्या पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करावे, फुलांमध्ये प्रवेश करू नये, तसेच परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले आहे.
Related
Articles
घोडेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा बोजवारा
30 Aug 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा
01 Sep 2026
ऊस वजनकाट्यांच्या तपासणीसाठी जिल्हानिहाय भरारी पथके
02 Sep 2026
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?
31 Aug 2026
पूर्व विभागाने मध्य विभागाला २६६ धावांत गुंडाळले
31 Aug 2026
दरोड्याच्या गुन्ह्यातील पोलिस अद्यापही पसार
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?