E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नात्यांची श्रीमंती ठरली जीवनदायिनी! पतीने पत्नीला, आईने मुलाला दिली किडनी
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
कोल्हार (संजय शिवलेकर) : रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाची नाती अधिक घट्ट असतात, याचा प्रत्यय डॉ. विठ्ठलराव विखे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात आला. एकाच दिवशी झालेल्या दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये पतीने पत्नीला, तर आईने मुलाला स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले. प्रेम, माया, त्याग आणि माणुसकीचा आदर्श घडविणार्या या दोन्ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरल्या.
घारगाव-अकलापूर (ता. संगमनेर) येथील सुनिता साबळे (३३) यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. पत्नीच्या आरोग्यासाठी पती प्रवीण साबळे (४२) यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनातील ‘सुख-दुःखात साथ देईन’ या वचनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.
दुसर्या प्रकरणात बेल्हे (पुणे) येथील अनिकेत गुंजाळ (२२) यांच्यासाठी त्यांच्या आई हिरा गुंजाळ (५५) यांनी किडनी दान केली. जन्म देणार्या आईने आपल्या मुलाला अवयवदानातून जणू दुसरे जीवनच दिले.दोन्ही शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या. अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. विपिन विभुते यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांनी सहकार्य केले.प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांनी दोन्ही अवयवदात्यांचे कौतुक केले. ‘अवयवदान म्हणजे जीवनदान’हा संदेश या दोन्ही घटनांनी दिला आहे.
Related
Articles
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
विद्यार्थिनीच्या वडिलांवर हल्ला करणार्याला पोलिस कोठडी
05 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
महाराष्ट्रासह मध्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
08 Sep 2026
आयटीसी भागधारक होणार ‘हॅपी’
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार