E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शेवगाव तालुक्यात पावसाची दडी; खरीप धोक्यात
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
शेवगाव (वार्ताहर) : तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने तब्बल ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून, शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात खरीप पिकांसाठी ६५ हजार ११७ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जूनमधील रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकर्यांनी कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मका, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. यंदा जवळपास ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे.
पावसाअभावी विहिरी, तलाव, नदी-नाले आटल्याने अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील १८ गावे व जवळच्या १०२ वाड्या-वस्त्यांना सध्या १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पूर्व भागातील २० हजाराहून अधिक ग्रामस्थांना भरपावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
पिकांवर बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर मोठा खर्च करूनही पावसाअभावी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे केलेला खर्च वसूल होईल की नाही, या चिंतेने शेतकरी त्रस्त आहेत. पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकर्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणावर तसेच शेवगावच्या बाजारपेठेवर होण्याची भीती आहे. कपाशीच्या उत्पादनावर तालुक्यातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित अवलंबून आहे.
प्रशासनाने चारा टंचाई तीव्र होण्यापूर्वी तालुक्यात ठिकठिकाणी चारा डेपो सुरू करावेत. तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (मंगळवारी) निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.‘पाऊस कधी येईल आणि पीक कसे वाचेल?’ या चिंतेने शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
Related
Articles
अमेरिकेच्या सरकारला फसविणार्यास पंजाबमध्ये अटक
07 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
श्रीकृष्ण जयंती, दहीहंडीनिमित्त वाहतुकीत बदल
04 Sep 2026
राज्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरपाई द्या
04 Sep 2026
लाइफ सायकल फंड
07 Sep 2026
श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार