ना पाऊस, ना वारा, तरीही बत्ती गुल!   

महावितरणच्या कारभारामुळे नागरिक हैराण 

पंढरपूर, (प्रतिनिधी) : पंढरपूर शहर व ग्रामीण भागात वादळी वारा नाही, जोराचा मुसळधार पाऊसही नाही तरीही शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अजूनही थांबवलेले नाहीत. त्यामुळे प्रचंड उकाडा, डासांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. दुसरीकडे महावितरणच्या अधिकार्‍यांकडून पावसात ब्रेक डाऊनचे प्रमाण नगण्य असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, खंडित वीजपुरवठा होण्याचा प्रकार थांबायला तयार नाही.
 
पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातील  ३३ केव्ही उपकेंद्रावर एकूण असे एकूण सहा फिडर आहेत. सध्या या सहापैकी  ग्रामीण फिडरमधील कृषी पंपांचा अतिरिक्त लोड येत असल्याने पंढरपूर शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
 
आता महावितरणकडून हे फिडर वेगळे करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. त्यासाठी वेगळी लाइन करण्यात येत आहे. परंतु, शहरातील बायपास जवळील एका पेट्रोलपंप चालकाने वीजलाइन अंडरग्राउंड करण्याची मागणी करत काम रोखले आहे. पंढरपूर शहरातील १३२ केव्हीवर फिडर असून यावर सहा सबस्टेशन आहेत.

दोन नवीन स्वतंत्र फिडर केले जाणार

पंढरपूर शहरातील ३३ केव्हीचे आता दोन फिडर स्वतंत्र केले जाणार आहेत. ग्रामीण  हे स्वतंत्र तीन फिडर असणार आहेत.
 

Related Articles