E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पैठणीवर आता बारकोड
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
असली-नकलीची होणार ओळख
पंढरपूर, (प्रतिनिधी) : पैठणी साडीची अस्सलता ग्राहकांना सहज ओळखता यावी आणि बनावट पैठणीच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी शासनाने पैठणीवर बारकोड छापण्याचा निर्णय घेतला आहे. या बारकोडच्या माध्यमातून पैठणी खरी आहे की खोटी, याची माहिती ग्राहकांना मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर माहिती दिली.
पैठणी ही महाराष्ट्राची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख असून, तिच्या नावावर बाजारात बनावट साड्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच अस्सल पैठणी तयार करणार्या विणकर व उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाने बारकोडची संकल्पना पुढे आणली आहे.
पैठणीवर छापण्यात येणार्या बारकोडमुळे संबंधित साडीची ओळख आणि अस्सलतेची पडताळणी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैठणी खरेदी करताना अधिक विश्वासार्हता मिळेल, तसेच अस्सल पैठणीच्या बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील पैठणी उद्योग हा अनेक विणकर, कारागीर आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. पारंपरिक हातमागावर तयार होणार्या अस्सल पैठणीला बाजारपेठेत योग्य स्थान मिळावे, यासाठी शासनाच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.सावकारे यांच्या या घोषणेमुळे पैठणी खरेदी करणार्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, अस्सल पैठणी आणि बनावट पैठणीतील फरक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
Related
Articles
झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’
04 Sep 2026
सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले
31 Aug 2026
श्रीकृष्ण जयंती, दहीहंडीनिमित्त वाहतुकीत बदल
04 Sep 2026
गदर पार्टीचे राजदूत - डॉ. मथुरा सिंह
04 Sep 2026
सीजेपीच्या आंदोलनामागील शक्ती ओळखा
01 Sep 2026
लष्करासाठी ‘स्पर्श’द्वारे पेन्शनची माहिती
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?