E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
थेरगाव 16 नंबर ते बारणे कॉर्नर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
रस्ता दुरुस्ती तातडीने करा अन्यथा आंदोलन छेडणार : संभाजी ब्रिगेडचा इशारा
पिंपरी
: थेरगाव मधील 16 नंबर ते बारणे कॉर्नर या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून तसेच संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना होताना दिसत नाहीत. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः अनेक ठिकाणी रस्ता खचून चेंबर वरती आलेले आहेत त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. रस्त्याची दुरवस्था ही नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे.नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कर भरूनही नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असेल, तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 16 नंबर ते बारणे कॉर्नर रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. रस्त्याचे दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण लवकरात लवकर करावे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकार्यांवर कारवाई करावी नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा महानगरपालिकेसमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
Related
Articles
दहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’
04 Sep 2026
ना पाऊस, ना वारा, तरीही बत्ती गुल!
01 Sep 2026
‘छात्रों की गूँज’मुळे भाजपला धडकी
01 Sep 2026
विमानतळावर टॅक्सी प्रवाशांची लाखोंची लूट
03 Sep 2026
डास मारण्यासाठी तलवार का वापरता?
30 Aug 2026
कोयना पूर्ण क्षमतेने भरले
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?